Header Ads

Header ADS

चोरीच्या चार दुचाकींसह दोन चोरटे पोलीसांच्या जाळ्यात

Two-workers-injured-in-accident-in-new-project-of-Dipnagar


चोरीच्या चार दुचाकींसह दोन चोरटे पोलीसांच्या जाळ्यात

लेवाजगत न्यूज जळगाव-चोरीच्या चार दुचाकींसह दोन चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव तालुक्यातील कल्याने होळ येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ४ दुचाक्या जप्त करण्यात आले आहे.

  यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कल्याने होळ गावात राहणारा करण लक्ष्मण गायकवाड हा तरुण गावात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटीलझ भूषण पाटील, महेश सोमवंशी यांनी कारवाई करत संशयित आरोपी करण गायकवाड याला शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने ही चोरी त्याच्या साथीदार गोपाल सुरेश भिल वय-२२, रा. वराड ता. चोपडा यांच्यासोबत केल्याचे कबुली दिली. त्यानुसार पथकाने त्यालाही अटक केली. त्यांच्याकडून एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ४ दुचाकी जप्त करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.