Header Ads

Header ADS

भूमीपुत्रांच्या विकासासाठी उरणची लाडकी बहीण श्रीकन्या तेजस डाकी निवडणुकीच्या रिंगणात

 


भूमीपुत्रांच्या विकासासाठी उरणची लाडकी बहीण श्रीकन्या तेजस डाकी निवडणुकीच्या रिंगणात              लेवाजगत न्यूज उरण (सुनिल,ठाकूर ): अनेक समस्यानी ग्रासलेल्या उरण तालुक्याला बळ द्यायचा असेल तर स्त्री शक्ती मैदानात उतरणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच उरण च्या भूमिपुत्रां ची लाडकी बहीण श्री कन्या तेजस डाकी ह्या उरण विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे पनवेल संघर्ष समिती चे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जाहीर केले. आणि पहिल्याच मेळाव्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले. समाज सेवेचा वारसा आपले सासरे कैलास डाकी आणि पती तेजस डाकी यांच्या कडून मिळाल्याने श्रीकन्या ताई देखील समाज कार्यातून राज कारणात पाऊल ठेवत आहेत. त्या वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षित असून समाज कार्याची जाण असलेल्या सामान्य भूमिपुत्र कुटुंबातील एक व्यक्ती आहेत.२० ऑकटोबर २०२४ रोजी उरण तालुक्यातील  बोरखार येथील सुखकर्ता निवास स्थानी जनसंवाद निमित्ताने उरण सभा निवडणूकी साठी श्री कन्या तेजस डाकी यांच्या उमेदवारी ची जाहीर घोषणा यावेळी करण्यात आली. जनसंवाद सभेचे प्रमुख मार्गदर्शक पनवेल संघर्ष समिती चे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सभेतील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता उरण मतदार संघातून भूमी पुत्रां ची लाडकी लेक म्हणून श्री कन्या तेजस डाकी हिला साथ द्या.

 उरण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी स्त्री शक्तीला मत देऊन ऐतिहासिक बदल घडवा असे आवाहन करून श्रीकन्या तेजस डाकी यांना आपले शुभार्शीवाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.