Header Ads

Header ADS

दिपनगरच्या नवीन प्रकल्पातील दुर्घटनेत दोन कामगार जखमी

 

Two-workers-injured-in-accident-in-new-project-of-Dipnagar


दिपनगरच्या नवीन प्रकल्पातील दुर्घटनेत दोन कामगार जखमी

लेवाजगत न्यूज दिपनगर-तालूका भुसावळ येथील ६६० मेगॅवॅटच्या नवीन प्रकल्पात स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, दिपनगरच्या नवीन ६६० मेगावॅट क्षमतेच्या प्रोजेक्टमध्ये गॅस कटींगचे काम सुरू असतांना अचानक मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत फुलगाव येथील दीपक बाविस्कर तसेच परप्रांतीय अमितकुमार हे दोन कंत्राटी कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही कामगार हे पॉवर मेक या खासगी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी अनेकदा लहानमोठे अपघात घडत असतात. तथापि, स्फोट झाल्यावर देखील जखमी कर्मचाऱ्यांना अगदी लागलीच प्रथमोपचार देखील मिळाले नाहीत.

    दोन महिन्यांपूर्वी देखील याच ठिकाणी असाच अपघात झाला होता. तथापि, स्थानिक प्रशासन व संबंधीत कंपनीने हे प्रकरण दडपून टाकले होते. यामुळे या स्फोटाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही तर जखमी झालेल्या कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.