ट्रकखाली आल्याने महिलेचे दोन्ही पाय निकामी
जळगावात ट्रकखाली आल्याने महिलेचे दोन्ही पाय निकामी
लेवाजगत न्युज जळगाव:- किरणा साहित्य घेवून घरी परतणाऱ्या महिलेला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन्ही पायांचा चुराडा होवून ते पाय निकाम झाल्याची धक्कादायक घटना रविवारी २० ऑक्टोबरी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास इच्छादेवी चौकात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. ललिता प्रकाश सोनवणे (४७, रा. तांबापुरा परिसर, जळगाव) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, ललिता प्रकाश सोनवणे या महिला आपल्या पती अपंग व सासू आजारी यांच्या सोबत वास्तव्याला आहे. त्यांच्या दोघांचा आधार असलेल्या ललिता सोनवणे या एका सुपर शॉपमध्ये कामाला आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. रविवारी २० ऑक्टोबर रोजी ललिता या किराणा साहित्य घेऊन घरी परतत असताना आकाशवाणी चौकाकडून अजिंठा चौफुलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने इच्छादेवी चौकातील सर्कलजवळ त्यांना जोरदार धडक दिली. यात ट्रकच्या पुढील चाकाखाली महिलेचे दोन्ही पाय आल्याने त्यांचा अक्षरशः चुराडा होऊन ते निकामी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर महिलेचे नातेवाईक विवेकानंद बागूल व अन्य नागरिकांनी जखमी अवस्थेत महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या पायांची स्थिती पाहता तिला खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने लाखोंचा खर्च करणे शक्य नसल्याने या महिलेवर 'जीएमसी'तीलच आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत