अनिल चौधरी रावेर मधून परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर
परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी आज जाहीर रावेर मधून प्रहार तर्फे अनिल चौधरी
वृत्तसंस्था मुंबई-परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली.यामध्ये ८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर सांगली जिल्ह्यातील शिरोळ व मिरज या दोन मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उद्या जाहीर करण्यात येणार आहेत. परिवर्तन महाशक्ती आघाडीची पत्रकार परिषद सोमवारी पार पडली. यावेळी तिसऱ्या आघाडीच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली. महायुती आणि महाविकास आघाडी तुटणार, असा दावा बच्चू कडू यांनी यावेळी केला.
परिवर्तन महाशक्तीचे घोषित करण्यात आलेले उमेदवार
1)बच्चू कडू अचलपूर प्रहार जनशक्ती पक्ष
2) अनिल चौधरी रावेर यावल,प्रहार जनशक्ती पक्ष
3) गणेश निंबाळकर चांदवड,प्रहार जनशक्ती पक्ष
4) सुभाष साबणे देगलूर बिलोली ,प्रहार जनशक्ती पक्ष
5) अंकुश कदम ऐरोली,महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
6) माधव देवसरकर हदगाव हिमायतनगर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
7) गोविंदराव भवर हिंगोली,महाराष्ट्र राज्य समिती
8) वामनराव चटप राजुरा,स्वतंत्र भारत पक्ष
परिवर्तन महाशक्ती आघाडी विधानसभा निवडणूक लढवणार ही नाही, असे अनेकांना वाटत होते. पण आता आम्ही नावे जाहीर करत आहोत. आम्ही इतर पक्षांसारखे वेगवेगळे नावे जाहीर न करता एकत्र करत आहोत. भविष्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यातील एक पक्ष फुटून बाहेर निघणार आहे. तर महायुतीतील एक मित्र बाहेर जाणार असल्याचे आमच्या कानापर्यंत आले आहे, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला.
आमच्या आघाडीला तिसरी म्हणणारे आता तिसऱ्यात जाण्याची शक्यता आहे आणि आम्ही पहिल्यात राहणार आहोत, असाही दावा बच्चू कडू यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये कशाप्रकारचे वातावरण आहे, हे मला आहे. त्यामुळे आघाडी एकत्र राहू शकणार नाही. मुश्किलीने राहिली जरी तर बरेच उमेदवार हे आघाडीतील पाडले जातील. त्यासंदर्भातील बरेच फोन आमच्याकडे आले आहे. ४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होईल, असेही बच्चू कडू म्हणाले.
परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एक सशक्त आणि दणकट पर्याय महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवत आहोत. महाराष्ट्रात आज राजकारण नाही तर राजकारणातील टोळी युद्ध सुरू आहे. आम्हाला हा महाराष्ट्र स्वच्छ करायचा आहे. महाराष्ट्राची लयाला गेलेली राजकीय संस्कृती, राजकीय प्रगल्भता ती पुन्हा आणण्याचा निर्धार परिवर्तन महाशक्तीने केला आहे.
सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी सत्ता भोगली आहे. मात्र आजही आपण केवळ मूलभूत प्रश्नांवरच चर्चा करत आहोत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे लाँग टर्म व्हिजन बॉन्ड प्रोग्राम पहायला मिळत नाही. त्यामुळेच परिवर्तन महाशक्ती आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. १०-१५परिवर्तन महाशक्तीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चांगल्या उमेदवार आमच्या दररोज संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत, असे संभाजी राजे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत