Header Ads

Header ADS

टाटा मॅजिक मध्ये गोवंशाची निर्दयीपणे अवैधवाहतूक करणाऱ्या दोघांना मॅजिक सह घेतले पोलिसांनी ताब्यात

 

The two who were brutally-illegal-trafficking-of-cattle-in-Tata-Magic-were-arrested-by-the-police-with-Magic

टाटा मॅजिक मध्ये गोवंशाची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना मॅजिक सह घेतले पोलिसांनी ताब्यात

लेवा जगत न्यूज सावदा- काल सोमवार दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या टाटा मॅजिक छोटा हत्ती एम एच १५ सी के ७२६२ या गाडीमध्ये अवैद्यरीत्या दाटी दाटीने गुरांची वाहतूक करताना वृंदावन सुपर शॉप समोर मिळून आल्याने सावदा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.यात दोन युवकांना ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ महा पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम १९८९ चे कलम ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रावेर कडून टाटा मॅजिक मध्ये कोंबून तीन गो वंशाची वाहतूक करणाऱ्या शेख युसुफ शेख अलमुद्दीन वय २७ अमीर खान युसुफ खान वय २३ दोघे राहणार रसलपुर यांना वृंदावन सुपर शॉप समोरील रोडवर सार्वजनिक जागी बैल गोवंश कोंबुन दोरीने गळा व पाय बांधलेल्या स्थितीत त्यांना हालचाल करण्याची पुरेशी जागा न ठेवता त्यांची कोणतीही काळजी न घेता त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निर्दयीपणे  वाहतूक करताना वाहन मिळून आल्याने त्यांच्यावर मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.