सुट्टीत बाहेरगावी जाताय ! रोकडसह मौल्यवान वस्तू बँकेत ठेवा : सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांचे आवाहन
सुट्टीत बाहेरगावी जाताय ! रोकडसह मौल्यवान वस्तू बँकेत ठेवा : सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांचे आवाहन
लेवाजगत न्युज सावदा:-
दिवाळीच्या सुट्या लागल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करून रेल्वे वा ट्रॅव्हल्सचे आरक्षण केले आहे मात्र नेमकी ही संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर असल्याने नागरिकांनी बाहेरगावी जाताना नजीकच्या पोलीस ठाण्याला सूचित करावे तसेच घरात मौल्यवान दागिणे व रोकड न ठेवता बँक लॉकरमध्ये ठेवावी, असे आवाहन सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे.
किंमती ऐवज घरात न ठेवण्याचे आवाहन
दिवाळीनिमित्त शाळेला तसेच सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने अनेक कुटूंबाने बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले आहे. बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे घरात न ठेवता बँकेत लॉकरमध्ये ठेवावे तसेच पोलिसांना जाताना सूचित करावे, असे आवाहन सहा. निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे.
गल्लीतील बरेचसे कुटुंब हे सुटीवर जात असल्यास त्यांनी काही दिवसांकरीता गल्लीमध्ये रात्र गस्तीसाठी गुरखा नेमावा तसेच त्याबाबत पोलीस स्टेशनला कळवून तेथे गस्त करण्याची मागणी नोंदवावी व बंद घराच्या परीसरातीत लाईट सुरू राहील याची व्यवस्था करावी. आपल्या गल्लीमध्ये किंवा घराचा परीसर दिसेल अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करावा तसेच आपल्या शेजारच्यांशी संपर्कात रहावे, असेही आवाहन यंत्रणेने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत