Header Ads

Header ADS

समाज कल्याण आयुक्तालयात विविध पदांची भरती

 

Social-Welfare-Commissionership-Various-Posts-Recruitment

समाज कल्याण आयुक्तालयात विविध पदांची भरती

लेवाजगत न्यूज पुणे-समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरीलवर्ग-३ संवर्गातील एकूण २१९ पदांची सरळसेवेने भरती. (जाहिरात क्र. सकआ/आस्था/ प्र-२/पदभरती/ जाहिरात/ २०२४/ ३७४३ दि. ७ ऑक्टोबर २०२४)


(१) लघुटंकलेखक (स्टेनो टायपिस्ट) एकूण ९ पदे (भज-ब - १, भज-क - १, भज-ड - १, इमाव - २, आदुघ - २, खुला - २).


पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि लघुलेखन - ८० श.प्र.मि. आणि इंग्लिश टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन - ३० श.प्र.मि. वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.


(२) निम्नश्रेणी लघुलेखक (लोवर ग्रेड स्टेनो) एकूण ३ पदे (अज - १, विजा-अ - १, इमाव - १).


पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इंग्रजी लघुलेखन किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. (मराठी व इंग्रजी हे दोन्ही लघुलेखन १०० श.प्र.मि. असल्यास प्राधान्य.) आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. वेगाचे शासकीय प्रमाणपत्र आणि टर- CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता.


(३) उच्च श्रेणी लघुलेखक (हायर ग्रेड स्टेनो) एकूण १० पदे (अजा - १, अज - १, भज-ब - १, इमाव - २, आदुघ - १, सा.शे.मा.प्र. १, खुला - ३).


पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इंग्रजी लघुलेखन किंवा मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. वेगाचे शासकीय प्रमाणपत्र आणि MS- CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता. (मराठी व इंग्रजी दोन्ही लघुलेखन १२० श.प्र.मि. प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.)


(४) गृहपाल/अधिक्षक (वॉर्डन) (सर्वसाधारण) एकूण ६१ पदे (अजा - ५, अज - ५, विजा-अ - १, भज-ब - १, भज-क - २, विमाप्र - १, इमाव - ११, आदुघ - ६, साशैमाप्र - ६, खुला - २३) (२ पदे दिव्यांग आणि १ पद अनाथ उमेदवारांसाठी राखीव).


(५) गृहपाल/अधिक्षक (वॉर्डन) (महिला) एकूण ९२ पदे (अजा - ८, अज - ६, विजा-अ - २, भज-ब - १, भज-क - ३, भज-ड - १, विमाप्र - २, इमाव - १७, आदुघ - ९, साशैमाप्र - ९, खुला - ३४) .


(६) समाजकल्याण निरीक्षक (सोशल वेल्फेअर इन्स्पेक्टर) एकूण ३९ पदे (अजा - ३, अज - ३, भज-ब - २, भज-क - २, भज-ड - ३, विमाप्र - २, इमाव - ५, आदुघ - ४, साशैमाप्र - २, खुला - १३) (२ पदे दिव्यांगांसाठी राखीव).


(७) वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक - एकूण ५ पदे (अज - १, भज-क - १, इमाव - १, आदुघ - १, खुला - १).


पद क्र. ४ ते ७ साठी पात्रता : (अ) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, (ब) MS- CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता. वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ - १८ ते ४३ वर्षे; दिव्यांग - १८४५ वर्षे. (उन्नत व प्रगत गटामध्ये मोडणाऱ्या विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू नाही.)


निवड पद्धती : संगणक आधारित परीक्षा १०० प्रश्न (प्रत्येक प्रश्नास २ गुण). एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे. (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी २५ प्रश्न) गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी ४५ गुण प्राप्त करणे आवश्यक. निवड समितीने तयार केलेली निवड सूची १ वर्षासाठी विधीग्राह्य राहील.


परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - रु. १,०००/- (मागास प्रवर्गासाठी रु. ९००/-).


ऑनलाइन अर्ज https:// sjsa. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. ११ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करता येतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.