Header Ads

Header ADS

एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान २३ नोव्हेंबरला मतमोजणी

Single-phase-voting-on-November-20-in-Maharashtra-voting-on-23-November-counting


 एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान २३ नोव्हेंबरला मतमोजणी

लेवाजगत न्यूज नवी दिल्ली -निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

  असा असेल महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम

२३ ते २९ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

३० ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी

 ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार

२० नोव्हेंबरला राज्यात मतदान

२३ नोव्हेंबरला मतमोजणी

नुकतीच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडचा दौरा केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महाराष्ट्रात ९.६३ कोटी मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. याश्त ४ कोटी ९३ लाख पुरुष तर महिला मतदारांची संख्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात १ लाख १८६ मतदान केंद्र असल्याची माहितीही राजीव कुमार यांनी दिली. या निवडणुकीत जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्होटर ॲपमध्ये मतदारांना सर्व माहिती पाहता येणार आहे.

पैसे, मद्य, ड्रग्जचे वाटप यावर कडक नजर ठेवण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले असल्याचेही राजीव कुमार यांनी सांगितले. सर्व मतदार केंद्र दोन किलोमीटरच्या आत असावेत, अशा सूचनाही सर्वांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एका टप्प्यात आणि झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.