महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील लिपीक वर्गीय गट क कर्मचा-यांसाठी विभागीय परिक्षेचे नियोजन
महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील लिपीक वर्गीय गट क कर्मचा-यांसाठी विभागीय परिक्षेचे नियोजन
लेवाजगत न्यूज जळगाव दि.28 - महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत लेखा विषयक काम करणारे लिपीक वर्गीय (वर्ग ३) कर्मचाऱ्यांसाठी १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग १ व २) ही डिसेंबर २०२४ मध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे .
या परिक्षेचे परिपत्रक https://mahakosh.maharashtra.gov.in
https://mahakosh.maharashtra.gov.in च्या employee corner मधील Exams Tab किंवा DAT (mahakosh.in) च्या Notice board वर उपलब्ध आहे.
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार येथील वित्त विभागाचे व इतर विभागातील लेखा विषयक काम करणारे वर्ग ३ कर्मचारी ही परिक्षा देऊ शकणार आहे. या पदासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांनी ०८ नोव्हेंबर पर्यंत त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज कार्यालय प्रमुखांकडे द्यावयाचे आहेत. या कार्यालय प्रमुखांनी परिक्षेसाठीचे अर्ज छाननी करुन सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग येथे १४ नोव्हेंबर पर्यंत पाठवायची आहे. १४ नोव्हेंबर ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे.
तरी या पदासाठी इच्छुक पात्र कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत त्यांचे अर्ज पाठवावे असे आवाहन नाशिक विभागाचे लेखा व कोषागारे सहसंचालक महेश मुरलीधर बच्छाव, यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत