Header Ads

Header ADS

एसटीची दिवाळीतील भाडेवाढ यंदा नाही;प्रवाशांना दिलासा; महामंडळाला शेकडो कोटींचे नुकसान

 

ST-fare-increase-in-Diwali-this-year-is-no-relief-to-passengers-loss-of-hundreds-of-crores-to-the-corporation

एसटीची दिवाळीतील भाडेवाढ यंदा नाही;प्रवाशांना दिलासा; महामंडळाला शेकडो कोटींचे नुकसान

लेवाजगत न्यूज मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध मतदारांना खूश करण्यासाठी महायुती सरकारकडून विविध घोषणा, अनेक समाज घटकांची महामंडळे आणि योजनांचा पाऊस पाडला जात आहे. मुंबईतील टोल नाक्यावरील हलक्या वाहनांचा टोल रद्द करण्याचा निर्णय सोमवारी महायुती सरकारने घेतला. त्याचबरोबर एसटीची दर दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीत प्रवास करणाऱ्या एसटी प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी, दिवाळीमध्ये मिळणारे शेकडो कोटींच्या उत्पन्नावर एसटी महामंडळाला पाणी सोडावे लागणार आहे.


दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत जास्त मागणीमुळे, भरमसाठ तिकीट दर खासगी वाहतुकदारांकडून आकारले जाते. तसेच उत्पन्न वाढीसाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. यंदाही ही भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले. मात्र तीन दिवसांत म्हणजे १४ ऑक्टोबर रोजी हे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे. एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम यंदा जमा होणार नाही.

    ८ ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत १० टक्के भाडेवाढ प्रस्तावित होती. मात्र तरीही प्रवाशांचा एसटीला प्रतिसाद मिळाला होता. एसटीतून ७५ वर्षीय ज्येष्ठांना तिकीट दरात १०० टक्के सूट, ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना आणि महिलांना अर्ध्यादरात तिकीट सवलत देण्यात आली असल्याने गेल्यावर्षी दिवाळीत एसटी प्रवासात महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे एसटीने दिवाळीच्या कालावधीत ६१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. या हंगामात २० नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी एका दिवसात ३७.६३ कोटी रुपये उत्पन्न मिळवून एसटीच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली होती. तर, २१ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान दिवाळी हंगामात एसटीला २१८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.