वित्तीय साक्षरतेला चालना देण्यासाठी सेबी, एक्स्चेंज, डिपॉझिटरीज आणि इंडस्ट्री लीडर्स आर्थाजेनिक्स एक्स्पो २०२४ मध्ये आले एकत्र
वित्तीय साक्षरतेला चालना देण्यासाठी सेबी, एक्स्चेंज, डिपॉझिटरीज आणि इंडस्ट्री लीडर्स आर्थाजेनिक्स एक्स्पो २०२४ मध्ये आले एकत्र
उरण प्रतिनिधी सुनिल ठाकूर -बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्को) येथे आयोजित अर्थजेनिक्स एक्स्पो २०२४च्या पदार्पणात उद्योग क्षेत्रातील नेते, नियामक प्राधिकरणे आणि वित्तीय इनोव्हेटर्स एकत्र आले आहेत. दोन दिवस चाललेल्या या एक्स्पोमध्ये तरुण गुंतवणूकदारांपासून अनुभवी उद्योजकांपर्यंत सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित लावली होती. ते सर्व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य घडविण्यासाठी मौल्यवान दृष्टी आणि कौशल्ये मिळविण्यासाठी उत्सुक होते.
सेबीचे कार्यकारी संचालक व्ही. एस. सुंदरेशन, एनएसई, बीएसई, एमसीएक्सचे प्रतिनिधी तसेच, सीडीएसएल, एनआयएसएम, शेअरखान, अपस्टोक्स, पीजीआयएम म्युच्युअल फंड, एचडीएफसी सिक्युरिटीज आदी प्रमुख वित्तीय कंपन्यांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. या नेत्यांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर भारताला चालना देण्यासंबंधीचे विचार मांडले आणि दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी सुलभ वित्तीय शिक्षण आणि धोरणात्मक गुंतवणुकीची गरज असल्याची भूमिका मांडली.
उपस्थितांनी प्रत्यक्ष कार्यशाळांमध्ये भाग घेतला, संवादात्मक प्रदर्शन आणि चर्चासत्रांचा आनंद घेतला. यावेळी ‘रिअल-टाइम सिम्युलेशन’द्वारे गुंतवणूक धोरणांची चाचणी घेण्यात आली. या सत्रांमधये सहभागी झालेल्यांना मैत्रीपूर्ण पद्धतीने गुंतवून ठेवण्यात आले होते. गुंतवणूकदारांच्या ‘मॅचमेकिंग’ सत्रांबरोबरच ज्ञान आणि कृती यांच्यातील दरी भरून काढण्यास मदत झाली आणि सहकार्य आणि भविष्यातील उपक्रमांसाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
अंकित अजमेरा यांनी आपल्या प्रास्ताविकात देशातील वित्तीय साक्षरतेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. अशा प्रकारच्या एक्स्पोंची संख्या आणखी वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही आताच पुढील एक्स्पोची योजना आखत आहोत. अधिक नाविन्यपूर्ण सत्रे आणि नेटवर्किंगच्या विस्तारित संधींसह हे महत्त्वपूर्ण मिशन सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत."
उद्घाटन कार्यक्रमाच्या यशाबद्दल बोलताना अंकित अजमेरा म्हणाले, "आर्थाजेन एक्स्पोने भारतातील वित्तीय साक्षरतेच्या कार्यक्रमांसाठी एक नवा मानक उभा केला आहे. यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचा अविश्वसनीय उत्साह पाहायला मिळाला. ते या एक्स्पोमध्ये गुंतून गेले होते. ही फक्त सुरुवात आहे, असेही त्यांनी सांगितले. विकसित होत असलेल्या आर्थिक परिदृश्यात ‘नेव्हिगेट’ करण्यासाठी व्यावहारिक साधने आणि ज्ञान असलेल्या व्यक्तींना सक्षम करण्यावर त्यांनी कार्यक्रमाच्या लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडियाचे (एमसीएक्स) चीफ बिझनेस ऑफिसर ऋषी नाथनी म्हणाले, ‘जागतिक गुंतवणूकदार सप्ताहात आर्थाजेनिक्सचा पुढाकार आवश्यक आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे दोन गोष्टी. काय करावे हे जाणून घेणे आणि काय करू नये हे जाणून घेणे. काय करावे म्हणजे जोखीम समजून घेऊन आणि प्रभावीपणे नियोजन करून शहाणपणाने गुंतवणूक करणे. कष्टाने कमावलेल्या संपत्तीला धोका निर्माण करणारे घोटाळे भौतिक आणि डिजिटल गोष्टींद्वारे टाळावेत. आम्ही एमएसएमई, कॉर्पोरेट्स, शेतकरी आणि समान्य व्यक्तींना सक्षम करण्याचे उद्दीष्ट ठेवतो. त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास आणि आजच्या विकसनशील बाजारपेठेच्या लँडस्केपमध्ये सुरक्षित राहण्यास मदत करतो.’
अर्थजेनिक्स एक्स्पो हा भारतातील प्रमुख वित्तीय साक्षरता आणि नेटवर्किंग इव्हेंट आहे. ज्यात तरुण, प्रौढ आणि नवीन गुंतवणूकदारांना सक्षम करण्यासाठी साक्षर करण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रदर्शनात उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रे, कार्यशाळा आणि संवादात्मक प्रदर्शने आहेत. यात रोखेबाजारातील कंपन्यांच्या समभागातील (इक्विटी)गुंतवणुकीचा कल, वेल्थ मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग आणि आंत्रप्रेन्योरशिप याविषयी जाणून घेण्याची संधी मिळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत