अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळांमध्ये भरती
अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळांमध्ये भरती
लेवाजगत न्यूज पुणे-आयुक्त, अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये (मुंबई/ नागपूर/ छत्रपती संभाजी नगर) विभागातील ‘विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) अराजपत्रित’ व ‘वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क)’च्या एकूण ५६ पदांवर भरती. (जाहिरात क्र. १/२०२४)
(१) वरिष्ठ तांत्रिक सहायक (Sr. Technical Assistant) (गट-क) - एकूण ३७ पदे.
महिलांसाठी ३० पदे राखीव, माजी सैनिकांसाठी १५ पदे राखीव, दिव्यांग - १ पद राखीव.
पात्रता : विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र (Pharmacy) पदवी.
वेतन श्रेणी : एस-१३ (३५,४०० - १,१२,४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
(२) विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist) (गट-ब) अराजपत्रित - एकूण १९ पदे महिलांसाठी ६ पदे, दिव्यांग - १ पद राखीव (D/ HH कॅटेगरी).
पात्रता : औषध निर्माण शास्त्र पदवी किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमधील पदव्युत्तर पदवी किंवा विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी आणि औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव.
वेतन श्रेणी : एस-१४ (३८,४०० १,२२,८) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते.
वयोमर्यादा : अमागास - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ/आदुघ - १८ ते ४३ वर्षे, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त - १८ ते ४५ वर्षे, पदवीधर अंशकालीन - ५५ वर्षे.
निवड पद्धती : दोनही पदांसाठी ऑनलाइन परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाइप) स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. (सेक्शन- I - इंग्लिश लँग्वेज - १५ प्रश्न, सेक्शन- II - मराठी भाषा - १५ प्रश्न, सेक्शन- III - जनरल नॉलेज आणि लॉजिकल अॅबिलिटी - ३० प्रश्न, सेक्शन- IV - विषयाचे ज्ञान - ४० प्रश्न).
एकूण १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुणांसाठी, एकूण २०० गुण, वेळ २ तास.
परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून शिफारस/निवड सूची तयार करण्यात येईल. शिफारस झालेल्या उमेदवारांची यादी www. fda. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत उमेदवारास काही हरकत असल्यास प्रति प्रश्न रु. १००/- इतके शुल्क आकारले जाईल.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग रु. १,०००/-; राखीव प्रवर्ग रु. ९००/-. माजी सैनिकांना फी माफ आहे.
ऑनलाइन अर्ज www. fda. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. २२ ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत