Header Ads

Header ADS

प्राध्यापक डॉ. रितेश सुधाकर फेगडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०२४ प्रदान करून गौरव

Professor-Dr-Ritesh-Sudhakar-Fegde-honoured-by-granting-the-state-level-meritorious-teacher-award-2024-


प्राध्यापक डॉ. रितेश सुधाकर फेगडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०२४ प्रदान करून गौरव

 लेवाजगत न्यूज जळगाव -राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ.महेंद्र काबरा, अध्यक्ष, काबरा फाउंडेशनचे, वरिष्ठ माजी सैनिक अधिकारी श्री. सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, कृषी तज्ज्ञ विजय पराग, सेवानिवृत्त जेलर जी.के.गोपाळ (नाशिक), ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.शैलेंद्र भणगे (छत्रपती संभाजीनगर), सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक परदेशी आणि व्यासपीठावरील इतर मान्यवर यांच्या हस्ते प्राध्यापक डॉ. रितेश सुधाकर फेगडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०२४ प्रदान करून गौरवण्यात आले.

डॉ. राजेंद्रकुमार जी तातेड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रितेश सुधाकर फेगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथून यांत्रिकी शाखेमध्ये पीएचडी पदवी संपादन केली तसेच त्यांनी सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्राद्योगिकी संस्थान सुरत येथून मास्टर ऑफ टेकनॉलॉजि ची पदवी टर्बोमाशीन शाखेमध्ये संपादन केली. त्यांनी आपले अभियांत्रिकी ची पदवी यांत्रिकी शाखेमध्ये जळगाव जिल्ह्यातील रोझोदा ह्या मूळगावी राहून जे.टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूर येथून संपादन केली. त्यांनी  जागतिक उत्तम दर्जाच्या विविध मासिकांमध्ये आपले १५ पेक्ष्या जास्त शोधनिबंध सादर केलेले आहेत तसेच त्यांचे भारत सरकार द्वारे मान्यता प्राप्त झालेले ३ पेटंट आहेत. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर समाजाच्या विविध स्तरांतून शुभेच्यांचा वर्षाव होत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आजपर्यंतच्या सर्व यशाचे श्रेय त्यांचे आई-वडील आशा सुधाकर फेगडे आणि कै. सुधाकर पुरुषोत्तम फेगडे यांच्या अथ्थक परिश्रमाला जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.