Header Ads

Header ADS

सामूहिक हनुमान चालीसा पठन कार्यक्रमाचे सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात अमावस्या निमित्त आयोजन


Organization of mass-Hanuman-Chalisa-recitation-programme-at-Sri- Swaminarayan-Temple-on-the-occasion-of-Amavasya-at-Savada


सामूहिक हनुमान चालीसा पठन कार्यक्रमाचे सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात अमावस्या निमित्त आयोजन

लेवा जगत न्यूज सावदा- वडताल धाम येथील  श्री लक्ष्मीनारायण देव द्विशताब्दी महोत्सवा अंतर्गत श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे गेल्या एक वर्षापासून दर अमावस्येला सभेचे आयोजन करण्यात येत असते. पितृपक्षातील अमावस्या निमित्त दिनांक २ रोज बुधवार संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी फैजपूर येथील कष्टभंजन देव ग्रुप तर्फे सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच धार्मिक सभेचे ही आयोजन आहे. तरी आपण या हनुमान चालीस पठण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी यांनी केले आहे. कार्यक्रम श्री स्वामीनारायण मंदिर सावदाच्या प्रांगणात संध्याकाळी सहा पंचेचाळीस ते आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल.

 तरी सर्व महिला, युवक, युवती व भाविक हरीभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.