Header Ads

Header ADS

घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री इंद्रायणी एकवीरा मंदिर परिसर विद्युती करण कामाचा भुमी पुजन सोहळा संपन्न

 

On the occasion of the inauguration of Sri-Indrayani-Ekvira-Temple-Premises-Electrification-of-Bhumi-Pujan-Ceremony-Completed



घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री इंद्रायणी एकवीरा मंदिर परिसर विद्युती करण कामाचा भुमी पुजन सोहळा संपन्न 

लेवाजगत न्यूज उरण ( सुनिल,ठाकूर ): उरण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार महेश बालदी यांनी स्वतःला झोकून घेतले आहे.त्याचा एक भाग म्हणून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री इंद्रायणी एकवीरा मंदिर परिसर विद्युती करण साठी आपल्या आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजन सन २०२४-२०२५ अंतर्गत ४० लाखाचा निधी मंजूर केला आहे.तसेच कळंबुसरे गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी १२ लाखाचा निधी मंजूर केला असून त्या दोन्ही कामाचा भुमि पुजन सोहळा गुरुवारी (दि३) घटस्थापनेच्या मुहूर्तावर आमदार महेश बालदी यांच्या  उपस्थितीत पार पडला .


  उरण कळंबुसरे परिसरातील समाजसेवक कै.सुरेशशेठ राऊत यांनी इंद्रायणी डोंगर माथ्यावर श्री एकवीरा देवीच्या मंदिराची उभारणी केली आहे.या मंदिराची दखल शिवसेनाप्रमुख हिन्दु हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. सध्या हे मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.या मंदिरात जत्रा उत्सव, शारदा नवरात्रौत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.मात्र विद्युत रोषणाईच्या तुटपुंज्या सेवेमुळे भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळावा तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी इंद्रायणी एकवीरा माता ट्रस्ट कळंबुसरे चे सुशील राऊत, सुरेंद्र राऊत आणि मित्र परिवार यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कडे मागणी केली.


    आमदार महेश बालदी यांनी सदर मागणीची दखल घेऊन आपल्या आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजन मधून इंद्रायणी मंदिर परिसर विद्युती करण साठी ४० लाखाचा निधी मंजूर केला आहे.त्या कामाचा भुमि पुजन सोहळा घटस्थापनेच्या मुहूर्तावर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पार पडला.समाजसेवक सुरेश शेठ राऊत यांचे स्वप्न आज विद्युत रोषणाईच्या कामातून पुर्णत्वास जात असून भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी लवकरच लवकर मंदिर परिसरात रस्त्या बरोबर पाणी पुरवठा करण्याचे काम शासन स्तरावरुन हाती घेतले जाणार असल्याची ग्वाही आमदार महेश बालदी यांनी याप्रसंगी बोलताना दिली.तसेच उद्योजक पी.पी.खारपाटील हे मंदिर परिसरात ५०० झाडे लावून त्यांचे संगोपन करणार असल्याने त्यांचे आभार मानले.


     यावेळी उद्योजक पी.पी.खारपाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष रवि शेठ भोईर, महावितरण चे अभियंता जयदीप नानोटी, महावितरण चे अभियंता सतीश सर्वोदय, महिला तालुकाध्यक्ष अँड राणी म्हात्रे, कळंबुसरे सरपंच उर्मिला निनाद नाईक, प्रशांत नाईक, उपाध्यक्षा संगीता रविंद्र गायकवाड,पुर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, जेष्ठ नेते सुरदास राऊत, रत्नाकर राऊत, इंद्रायणी एकवीरा माता ट्रस्ट कळंबुसरे चे तथा माजी सरपंच सुशील राऊत, उद्योजक सुरेंद्र राऊत, उप अभियंता वर्षा मगर,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,साई सरपंच हिराजी मोकळं,उद्योजक कुलदिप नाईक, कळंबुसरे शाखा अध्यक्ष राजेश पाटील, उद्योजक सागर खारपाटील,उद्योजक देवेंद्र पाटील,सुशांत पाटील, गजानन केणी, रमेश फोफेरकर, जयेश खारपाटील सह पदाधिकारी , कार्यकर्ते, भक्तगण उपस्थितीत होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी सरपंच सुशिल राऊत,सुरदास राऊत यांनी आमदार महेश बालदी व महावितरण कंपनीचे अभियंता यांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.