नवी मुबई चेंबूरमधील मंदिरात भीषण आग
नवी मुबई चेंबूरमधील मंदिरात भीषण आग
लेवाजगत न्यूज मुंबई: चेंबूर कॉलनी परिसरातील संतोषी माता मंदिरात शनिवारी दुपारी २.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग्निशामक आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
चेंबूर कॉलनी परिसरातील एनलक्स रुग्णालयाच्या शेजारी हे मंदिर असून शनिवारी दुपारी २.१५ च्या सुमारास मंदिरात अचानक आग लागली. यावेळी मंदिरात अनेक भाविक उपस्थित होते. आग लागताच भाविकांनी मंदिरा बाहेर धाव घेतली. तसेच आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंत तात्काळ अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाचे जवानांनी बचावकार्य हाती घेतले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली हे समजू शकलेले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत