Header Ads

Header ADS

नागरिकांच्या जीवाची पर्वा कुणाला? जनतेच्या न्याय हक्कासाठी मंगळवार रोजी पत्रकार करणार सावद्यात रस्ता रोको व अन्नत्याग आंदोलन

Who cares about the lives of the citizens, for the right of the people to justice, the journalists will hold a road stop and food sacrifice movement on Tuesday.


नागरिकांच्या जीवाची पर्वा कुणाला ?

जनतेच्या न्याय हक्कासाठी मंगळवार रोजी पत्रकार करणार सावद्यात रस्ता रोको व अन्नत्याग आंदोलन

लेवा जगत न्यूज सावदा- अंकलेश्वर बुऱ्हानपूर महामार्ग केळीचे माहेरघर असलेल्या परिसरातून मुख्य रहदारीचा प्रमुख मार्ग आहे.सदरील महामार्गावरून रोज मोठ्या प्रमाणात शेत मालाची ,नागरिकांची ,औद्यगिक साधनांची आवक जावक दळणवळणाच्या माध्यमातून होत असते. हजारो कोटी रुपयांची उलाढाल करून देत असलेल्या अंकलेश्वर बुऱ्हानपूर महामार्ग यामुळे स्थानिक तसेच देश पातळीवर असलेल्या विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा मुख्य स्त्रोत जुन्या काळापासून चालत आलेला आहे .अंकलेश्वर बुऱ्हानपूर महामार्ग यामुळे परिसरातील शेतकरी,उद्योग ,शिक्षण ,कामगार ,अशा नानविध प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ होत असतो. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळत असते ,परंतू  आणि अधिकारी यांच्या स्वतःचे पोट भरण्याच्या नादात अंकलेश्वर बुऱ्हानपूर महामार्गाचे तीन तेरा झालेले दिसत आहे. रस्त्याच्या दुर्दर्शेमुळे रोज मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत ,काहींना जीव गमवावा लागला ,नागरिकांची रस्त्याने जात असताना ,वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे .बऱ्याच काळापासून पत्रकारांनी बातम्यांच्या माध्यमातून ,निवेदनां मधून संबंधित विभागांना तोंडी तथा लेखी स्वरुपात कळविले परंतु पत्रकारांच्या सदरील गोष्टींचा अधिकारी आणि पदाधिकारी यांनी फायदा घेत निधी मंजूर करून स्वतःचेच खिसे भरून घेतलेले आहे असे दिसत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष  वातावरण निर्माण झालेले आहे, मागील वर्षी पत्रकारांनी अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. त्यास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद मिळता झाला हे लक्षात घेता परिसरातील संत मंडळी ,लहान राजकीय कार्यकर्ते अश्या जाण असलेल्या जागरूक नागरिकांचा सदरील आंदोलनास मोठा पाठींबा मिळाला ,सदरील आंदोलनास मिळत असलेला पाठींबा आणि जनाक्रोष समोर येता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडू नये म्हणून बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर फैजपूर ते रावेर पर्यंत असलेल्या मोठमोठ्या खड्यानबाबत दुरुस्ती करण्यासाठी सावदा येथील विश्रामगृह येथे कोठारीशास्री भक्तीकिशोरदासजी,रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी ,भाजप जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे ,तहसीलदार बंडू कापसे ,नायब तहसीलदार संजय तायडे ,NHAI चे कार्यकारी अभियंता चंदन गायकवाड व सार्वजनिक बांधकाम चे अभियंता व्ही.के.तायडे व ताप्ती सातपुडा जर्नालीस्ट असोशिएशनचे पदाधिकारी यांची बैठक झाली त्यात ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत रस्ता दुरुस्त करण्याचे सूचित करण्यात आल्या होत्या  , त्यामुळे अधिकारी यांनी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्या कारणामुळे सदरील आंदोलन मागे घेण्यात आले परतू अधिकारी आणि पदाधिकारी यांनी सदरील रस्ता दुरुस्ती च्या नावाखालील सुईभर सुद्धा काम न करता  सर्व निधी कामे दाखवून परस्पर लाटून घेतल्याचा जनमानसात आवाज घुमत असल्या आहे  आणि सदरील महामार्गाची असलेली दुर्दशा पाहून ताप्ती सातपुडा जर्नालीस्ट असोशिएशन आणि  वॉईस ऑफ  मिडिया यांनी पाठपुरावा केला असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सदरील महामार्गाच्या दुरुस्तीच्या विषयावर वारंवार टाळाटाळ केली .

त्यामुळे ताप्ती सातपुडा जर्नालीस्ट असोशिएशन आणि वॉईस ऑफ मिडिया यांनी  आंदोलनाचा इशारा दिलेला आहे ,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना आणि परिसरातील उच्चपदस्थ राजकीय लोकप्रतिनिधी  यांना वारंवार कळवून देखील यांनी कोणतीही प्रखर भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट  असोशिएशन आणि वॉईस ऑफ मिडिया यांनी दिनांक ८ ऑक्टोबर २०२४  वार मंगळवार  रोजी सकाळी  संविधानिक मार्गाने रस्ता रोको आणि अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिलेला असल्यामुळे ,होणाऱ्या हानीस राजकीय पदाधिकारी , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग हेच सर्वस्वी जबाबदार असतील अशी नोंद घ्यावी.सदरील आंदोलन आणि उपोषण हे नागरिकांसाठी असल्यामुळे जागरूक नागरिक आणि पत्रकार म्हणून जबाबदारी याचे भान असल्यामुळे परिसरातील सर्व रावेर यावल चोपडा या परिसरातील पत्रकारांनी त्यांच्या त्यांच्या गावातून याच वेळेला आंदोलनात सहभागी व्हावे व या बराणपुर अंकलेश्वर महामार्गावरच आंदोलन करावे ,पत्रकार व जागरूक नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.