Header Ads

Header ADS

NMIMS युनिव्हर्सिटीच्या वतीने रॅली आणि नुक्कड नाटकाद्वारे मानसिक आरोग्य जागरुकतेला चालना

 

NMIMS-University-Promoting-Mental-Health-Awareness-Through-Rally-and-Nukkad-Drama

NMIMS युनिव्हर्सिटीच्या वतीने रॅली आणि नुक्कड नाटकाद्वारे मानसिक आरोग्य जागरुकतेला चालना

लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर) : सायकोलॉजी कमिटी ऑफ एनएमआयएमएस, नवी मुंबई’ने रोटरॅक्ट क्लब ऑफ एनएमआयएमएस सनराईज आणि स्टुडंट कौन्सिल, स्कूल ऑफ लिबरल आर्टस्’च्या साथीने मानसिक आरोग्य जागृतीचा प्रसार करण्यासाठी दिमाखदार रॅलीचे आयोजन आज करण्यात आले. या सामाजिक जनजागृती उपक्रमात हिरव्या रंगाच्या वेशात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग घेतला. 

या माध्यमातून मानसिक आरोग्यविषयक महत्त्व समाजातील घटकांना पटवून देण्यात येईल. तसेच समाजातील अतिमहत्त्वाच्या विषयावर खुल्या चर्चेला प्रोत्साहन मिळणार आहे.

एनएमआयएमआय कॅम्पसमध्ये सकाळी ९.०० वाजता इव्हेंट सुरू झाला. त्यात विद्यार्थी आणि समाजातील घटक मानसिक कल्याणाचे संदेश असलेले फलक घेऊन रॅलीत सहभाग झाले होते. ही भव्य मिरवणूक शेजारील विद्यापीठ तसेच मुख्य परिसरातून फिरल्याने लक्षवेधी ठरली आणि बघ्यांमध्ये चर्चेला वाट करणारी ठरली.

मानसशास्त्र समितीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या आकर्षक 'नुक्कड नाटक' पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी रॅलीनंतर गर्दी केली. मानसिक आरोग्याच्या समस्यांचे अनेक पैलू या नाटकाने नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर झाले. यावेळी मदतीचा शोध घेणयासोबत इतरांना मदत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापिका-प्रभारी अर्पिता सरकार या कार्यक्रमाच्या समन्वयक होत्या आणि इतर उद्दिष्टांसह मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यात आले. कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुभाशीष भट्टाचार्य यांनी रॅलीच्या प्रारंभी विद्यार्थ्यांशी बोलताना बदल स्वीकार आणि निरोगी उपक्रमांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबद्दल शिक्षित करणे आणि जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दोन दिवसांचा उत्सव आणि उपक्रम लॉन्च केला.

हा कार्यक्रम दोन दिवस एनएमआयएमएस नवी मुंबई कॅम्पसमध्ये रंगला. यावेळी अ ग्रॅटीट्यूड ट्री, अ डान्स मूव्हमेंट,थेरपी वर्कशॉप, पॅनल टॉक, सायकलॉजिकल टेस्टिंग यासारखे गुंतवून ठेवणारे उपक्रम राबविण्यात आले. मानसिक

आरोग्याशी निगडीत समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या या रॅलीत मंचावरून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन केले.

एनएमआयएमएसच्या आयोजकांनी विद्यार्थ्यांकरिता ज्याप्रकारे साह्यकारी वातावरणाची निर्मिती केली त्याचेही आम्हाला विशेष कौतुक वाटते. यावेळी विद्यार्थी अजिबात लाज, संकोच न बाळगता स्वत:ची मानसिक आरोग्यविषयक आव्हाने बिनदिक्कत मांडली. त्याशिवाय सभोवताच्या लोकांना मदत करण्याची तयारी दर्शवली.

मानसिक आरोग्याचा मार्ग चिंतन आणि सुरक्षित जागेचे पोषण करण्याच्या धैर्याने सुरू होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.