Header Ads

Header ADS

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये कोलोप्रोक्टोलॉजी कार्यशाळेचे आयोजन ११०० पेक्षा जास्त क्लिनिशियन्सचा सहभाग

 

More than 1100-clinicians-organization-of-Coloproctology-Workshop-at-ApolloHospital-New-Mumbai

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये  कोलोप्रोक्टोलॉजी कार्यशाळेचे आयोजन ११०० पेक्षा जास्त क्लिनिशियन्सचा सहभाग

लेवाजगत न्यूज उरण :-अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने असोसिएशन ऑफ कोलन अँड रेक्टल सर्जन्स ऑफ इंडिया (एसीआरएसआय) आणि नवी मुंबई सर्जिकल सोसायटीच्या (एनएमएसएस) सहयोगाने नवी मुंबईमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये बेनिग्न कोलोप्रोक्टोलॉजीवर कार्यशाळेचे आयोजन केले होते. जनरल लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीचे सिनियर कन्सल्टन्ट डॉ नितीश झावर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये दहा कोलोरेक्टल सर्जरीची लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन्स दाखवली गेली आणि या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला गेला. यामध्ये २५० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी ऑनसाईट आणि ८३० जणांनी ऑनलाईन भाग घेतला, एकूण ११०० पेक्षा जास्त क्लिनिशियन्सयामध्ये सहभागी झाले होते.

   कोलोप्रोक्टोलॉजी कोलोन, गुद्द्वार आणि एनसच्या कॅन्सरव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांशी संबंधित आहे. बवासीर, एनल फिश्युर्स, फिस्टुला, जुनाट बद्धकोष्ठ, पॉलीप्स, डायव्हर्टिक्युलर आजार आणि एनोरेक्टल जखमा यासारखे आजार या श्रेणीमध्ये येतात. हे आजार जरी जीवघेणे नसले तरी त्यामुळे गंभीर असुविधा निर्माण होते आणि व्यक्तीच्या जीवन गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.

  मेडिकल तंत्रज्ञानामध्ये घडून येत असलेल्या प्रगतीमुळे आजाराचे निदान करण्यासाठी अधिक चांगली उपकरणे आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जिकल तंत्रे उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे कमीत कमी वेळेत रिकव्हरी होते आणि रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळतात, तसेच प्रभावी उपचारांमध्ये मदत मिळते. या प्रगतीमुळे अशा आजारांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता येत आहेत. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये कार्यशाळेसारखे शैक्षणिक उपक्रम ही नवीन तंत्रे सर्जन्सना शिकवण्यात मदत करतात.

   डॉ.नितीश झावर, जनरल लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीचे सिनियर कन्सल्टन्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“बेनिग्न कोलोरेक्टल सर्जिकल कार्यशाळा कोलोरेक्टल सर्जरीमध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह प्रक्रिया आणि लेझर सर्जरी यासारखे प्रगत तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट मंच ठरली. ११०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला ज्यामध्ये २५० पेक्षा जास्त ऑनसाईट आणि ८३० ऑनलाईन सहभागी झाले. लाईव्ह सर्जरी करणे, सहकारी सर्जन्ससोबत माहिती शेयर करणे आणि रुग्णांना दिली जाणारी देखभाल अधिक चांगली बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वाचे आहे यावर भर देणे हा एक विशेष अनुभव ठरला."

  श्री अरुणेश पुनेथा, वेस्टर्न रिजन रिजनल सीईओ, अपोलो हॉस्पिटल यांनी सांगितले,"अपोलो हॉस्पिटल्समध्ये आम्ही सातत्यपूर्ण शिक्षण आणि सहयोगाच्या माध्यमातून नावीन्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रुग्णांना दिली जाणारी देखभाल अधिक चांगली करावी यासाठी बांधील आहोत. बेनिग्न कोलोप्रोक्टोलॉजी सर्जिकल वर्कशॉपला मिळालेले यश वैद्यकीय प्रगतीमध्ये आम्ही आघाडीवर असल्याचे एक उदाहरण आहे. या वैद्यकीय प्रगतीमध्ये रुग्णांना लाभ प्रदान करण्याची क्षमता आहे. अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना नवनवीन सर्जिकल तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत माहिती मिळवण्यात मदत करतो, त्यामुळे दरवेळी रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळतात."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.