Header Ads

Header ADS

मस्कावद येथिल प्रवीण मधुकर वारके यांना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार

 

Maskavad-Yethil-Praveen-Madhukar-Warke-Yan-Tapi-Poorna-State-Level-Exemplary-Teacher-Teacher-Award

मस्कावद येथिल प्रवीण मधुकर वारके यांना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार

  लेवा जगात न्यूज सावदा -येथून जवळच असलेल्या मस्कावद येथील रहिवासी व शारदा माध्यमिक विद्यालय न्हावी तालुका यावल येथे २८ वर्षापासून उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार व अध्यात्मिक कार्यात सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने कार्य करीत असलेले प्रवीण मधुकर वारके यांना नुकतेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर चा १५ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून - तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सदर सन्मान सोहळा हा गोदावरी मंगल कार्यालय मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे व वनिताताई बोराडे( राष्ट्रपती सर्पमित्र पुरस्कार प्राप्त) शिवा सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

    वारके यांना मिळालेल्या पुरस्कारा निमित्त त्यांच्यावर आप्तेष्टांसह मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे लेवा जगत न्यूज परिवारातर्फे ही प्रवीण वारके यांना शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.