Header Ads

Header ADS

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांची घोषणा आजच- आज दुपारी किती वाजता निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद?

 

Maharashtra-Assembly-Elections-Announcement-today-this-afternoon-at-what-time-Election-Commission-will-hold-journalists-conference?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांची घोषणा आजच- आज दुपारी किती वाजता निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद?

लेवाजगत न्यूज मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची बहुप्रतीक्षित घोषणा आजच होणार आहे. राजकीय वर्तुळासह अख्ख्या महाराष्ट्राचं, किंबहुना देशाचं लक्ष लागून राहिलेल्या निवडणुका आज दुपारी जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीतून पत्रकार परिषद घेत दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा करेल. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू होईल. एकामागून एक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठका, निर्णयांचा सपाटा आणि रविवारच्या दिवशीही मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या लगबगीमुळे तसे संकेत आधीपासूनच मिळत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.