Header Ads

Header ADS

कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य-आमदार चंद्रकांत पाटील यांचे सावदा येथे पोलीस चौकी उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन

Law-abiding-it-is-your-duty-MLA-Chandrakant-Patil's-statement-at-police-post-inauguration-at-savada


 कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य-आमदार चंद्रकांत पाटील यांचे सावदा येथे पोलीस चौकी उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन

लेवा जगत न्यूज सावदा-सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत  रविवार दुपारी साडेबारा वाजता बस स्टॅन्ड समोरील चौकात अद्यावत अशा पोलीस चौकीचे उद्घाटन मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नकाते, मुक्ताईनगर विभागाचे डी वाय एस पी राजकुमार शिंदे, फैजपूर विभागाच्या डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग यांच्यासह सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गरजे, राहुल सानप ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी ,माजी उपनगराध्यक्ष शब्बीर हुसेन अत्तर हुसेन बोहरी ऊर्फ बाबू शेठ,फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण, फिरोज लेफ्टी,सिमरन वानखेडे,सूरज परदेशी,मनीष भंगाळे,शेख नाझीम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

    या उद्घाटन पर बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की या गजबजलेल्या बस स्टँड परिसरात अशा अद्यावत पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता होती, पोलीस प्रशासनाला आणि नागरिकांना या पोलीस चौकीचा लाभ घेता यावा यासाठी ही पोलीस चौकी महत्त्वाची आहे. सावदा शहर हे जुनी नगरपालिका असून परिसरातील नागरिक कायद्याचे पालन करीत आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी व प्रशासनास सहकार्य करावे असेही आवाहन केले.

      यावेळी महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की गाव हे शांतता प्रिय असून याचे उदाहरण म्हणजे आजपर्यंत एक वेळेसही  मी या शहरात आलो नाही आणि मला येण्याची आवश्यकता ही नाही असे हे शहर कायमस्वरूपी असेच सर्व धर्म समभावने रहावे असे त्यांनी सांगितले. यावेळी मुक्ताईनगर विभागाचे डी वाय एस पी राजकुमार शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले. यावेळी नागरिक,लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.