कर्जतमध्ये बनावट सिगारेट कंपनीवर मोठी कारवाई, ५ कोटींचा मुद्देमाल जप्त, १५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कर्जतमध्ये बनावट सिगारेट कंपनीवर मोठी कारवाई, ५ कोटींचा मुद्देमाल जप्त, १५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात
लेवाजगत न्युज कर्जत:-
कर्जतमध्ये (Karjat) बनावट सिगारेट (Fake Cigarettes) कंपनीवर गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. कर्जतमधील सांगवी गावाजवळ एका फॉर्म हाऊसवर एका बनावट सिगारेट बनवणाऱ्या फॅक्टरीवर रायगडमधील स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड मारली. यामधे तब्बल ५ कोटी रुपयांचे बनावट सिगारेट आढळून आले आहेत. यामध्ये २ कोटी ३१ लाख ६० हजार रुपयांचे सिगारेट ,१५ लाख ८६ हजार ९०० रुपयांचे लागणारे मटेरियल तर २ कोटी ४७ लाख रुपयांची साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
एकूण १५ आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले
या घटनेत एकूण १५ आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. यामधे ४ महाराष्ट्रातील ते अन्य पर राज्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एकूण ४ कोटी ९४ लाख ४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही गोल्ड प्लाग कंपनीची बनावट सिगारेट बनवणारी कंपनी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत