उरणमध्ये शेकापचे प्रितम म्हात्रे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन हजारो तरुणांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल
उरणमध्ये शेकापचे प्रितम म्हात्रे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन हजारो तरुणांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल
लेवाजगत न्यूज उरण सुनिल ठाकूर -नवीमुंबई परिसरातील उद्योजक तथा शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे यांचे सुपुत्र प्रितम म्हात्रे यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी ( दि२९) जोरदार शक्तीप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या कडे दाखल केला.यावेळी प्रितम म्हात्रे यांच्या मागे तरुणांची फौज उभी असल्याचे चित्र दिसून आले.
उरण विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी ( दि२८) दाखल केला.याच मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार म्हणून शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी ही मंगळवारी ( दि२९) आपला उमेदवारी अर्ज उद्योजक जे.एम.म्हात्रे, आपली पत्नी सौ.ममता प्रितम म्हात्रे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.यावेळी प्रितम म्हात्रे यांनी सांगितले कि मी आज माझा उमेदवारी अर्ज हा उरणच्या सर्वांगीण विकासासाठी सादर केला आहे.आमची महाआघाडी सोबत चर्चा सुरू आहे.त्यामुळे ४ तारखेला मी महाआघाडीचा उमेदवार राहणार त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे.एम.म्हात्रे, अँड मानसी म्हात्रे,उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, जेष्ठ नेते पांडुरंग म्हात्रे, कामगार नेते रवी घरत,मधुशेठ पाटील, सतिश घरत,,माजी सभापती नरेश घरत, तालुका चिटणीस विकास नाईक, महिला तालुका संघटक सीमाताई घरत,कुषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणशेठ घरत,तालुका युवा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील,सरपंच संतोष घरत,माजी उपसभापती शुभांगी सुरेश पाटील,प्रा.एल.बी.पाटील, जेष्ठ नेते काका पाटील, राजेंद्र मढवी,युवा नेते भारतराज थळी,माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे सह हजारो कार्यकर्त्यांनी प्रितम दादा म्हात्रे यांना उरणचे नेतृत्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे औचित्य साधून लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जासई येथील जन्मगावात सभेचे आयोजन करण्यात आले होते.प्रितम म्हात्रे यांना विजयी करण्याचा निर्धार उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी विशेष करून महिला वर्गानी केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत