Header Ads

Header ADS

गरबा दांडिया ऊर्जा उत्सर्जनाचा उत्तम स्त्रोत-ॲड भारती मुजुमदार

Garba-Dandia-Great-Source-of-Energy-Emission-Ad-Bharti-Mujumdar



गरबा दांडिया ऊर्जा उत्सर्जनाचा उत्तम स्त्रोत-ॲड भारती मुजुमदार

लेवाजगत न्यूज विवरे-येथील शिक्षण विकास मंडळ संचलित श्री ग. गो. बेंडाळे हायस्कूल  विवरे तालूका रावेर जिल्हा जळगाव. येथे नवरात्र उत्सवानिमित्त गरबा दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा श्री भरत महाजन माजी जि.प.सदस्य होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विकास मंडळ विवरे चेअरमन प्रा. शैलेश राणे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व गरबा दांडिया कार्यक्रमाचे उद्धाटक ॲड सौ.भारती राहुल मुजुमदार या होत्या.आपल्या मनोगतातून त्यांनी नवरात्री विषयी माहिती दिली व शाळेमध्ये आयोजित गरबा दांडियामुळे विद्यार्थ्यांचा भावनिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास होतो.शालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.भरत महाजन यांनी आपल्या मनोगतातून  शाळेच्या विविध उपक्रमांची कौतुक केले. केंद्रीय मंत्री नामदार श्रीमती.रक्षाताई खडसे यांच्या निधीतून मदतीचे आश्वासन दिले. शाळेमध्ये गरबा दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.परीक्षक म्हणून श्री एस व्ही येवले श्री ए जे सोळुंके श्रीमती एस व्हि सुरवाडे श्रीमती टि पी भिरूड यांनी कामकाज पाहिले या स्पर्धेमध्ये अनुक्रमे गट क्रमांक -१ प्रथम-- हेमांशी प्रकाश पाटील  क्रमांक प्राथमिक विभाग यांनी क्रमांक मिळविला. गट क्रमांक २ प्रथम आलिया युनुस तडवी इयत्ता ५ ते ७वी गट क्रमांक ३ इयत्ता ८वी ते १० वी गायत्री सुनिल बेंडाळे  गट क्रमांक ४ प्रथम सुमित दिपक महाजन तसेच शाळेतील विद्यार्थिनी कुमारी जानवी सुनील वाघोदे हिने तालुक्यातील क्रीडा स्पर्धां गोळा फेक या क्रीडा प्रकारातून जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड सौ भारती मुजुमदार यांनी सत्कार केला. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. मार्तंड भिरुड, संचालक किरण पाचपांडे, मुख्याध्यापक श्री पी.एच. वायकोळे, पर्यवेक्षक श्री.आर टी कोल्हे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हर्षाली बेंडाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती.सुनिता सुरवाडे व आभार सौ नीलिमा नेमाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीने परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी गावातील  महिला भगिनी उपस्थित होत्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.