विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर; ९९ जागांसाठी जाहीर केले उमेदवार, रावेर अमोल जावळे,भुसावळ संजय सावकारे,जळगांव सुरेश भोळे
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर; ९९ जागांसाठी जाहीर केले उमेदवार, रावेर अमोल जावळे,भुसावळ संजय सावकारे,जळगांव सुरेश भोळे
लेवाजगत न्यूज मुंबई-विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
या यादीनुसार, आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. रावेर अमोल जावळे,भुसावळ संजय सावकारे,जळगांव सुरेश भोळे भाजपा चे उमेदवार असतील.
खरं तर यंदा भाजपाकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, जी यादी जाहीर झाली आहे, त्यानुसार पक्षाने अनेक आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचे दिसून येत आहे.
भाजपाच्या उमदेवारांची संपूर्ण यादी :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत