Header Ads

Header ADS

फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार

 

Faizpur-Yethil-Dhanaji-Nana-College-Award-Best-College

फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार

लेवाजगत न्यूज  फैजपूर - येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित अव्यवसायिक महाविद्यालय गटातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार २०२३ नुकताच जाहीर झाला. या निमित्ताने तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी व व्यवस्थापन व नियामक मंडळ यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

   लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीतून परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासोबतच करिअरच्या विविध उज्वल संधी उपलब्ध व्हाव्यात व १९३६ च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाचे जिवंत स्मारक म्हणून येणाऱ्या असंख्य पिढ्यांना प्रेरणादायी ठरावे या उदात्त हेतूने महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

 तेव्हापासून आजतागायत महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर कला, शास्त्र व वाणिज्य शाखांमधील विविध विषय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यासोबत आधुनिक युगासोबत विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम बीबीए, बीसीए,  योग अभ्यासक्रम, सॉफ्ट स्किल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाविद्यालयाचा  ३७ एकरचा प्रशस्त परिसर असून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी सहित महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असा क्रीडाविभाग, प्रशस्त पटांगण व विविध खेळांचे साहित्य उपलब्ध आहे. सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, मीटिंग हॉल, इनडोअर हॉल यासहित प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विविध विषयासाठी स्वतंत्र विभाग उपलब्ध आहेत. सुमारे ८० हजार पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तके, संदर्भ ग्रंथ असलेले ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी विकास विभाग यांच्यासहित विद्यापीठाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र विभाग सक्रिय आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी या पुरस्काराचे श्रेय स्थापनेपासून आजतागायत महाविद्यालयाच्या जडणघडणीत मौल्यवान भूमिका पार पाडणाऱ्या सर्व व्यवस्थापन, प्रशासन,  प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्टेक होल्डर्स यांना दिले असून महाविद्यालयाचा हा आलेख असाच चढता राहील असे आशावाद व्यक्त केला. या पुरस्कारामुळे महाविद्यालयातील प्रत्येक घटकाचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून येणाऱ्या काळात विद्यापीठ परिक्षेत्रात नव्हे राज्य व राष्ट्रीय पातळीवर ही महाविद्यालयामार्फत विविध उपक्रम आयोजित केले जातील असा मनोदय व्यक्त केला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा डॉ व्ही एल माहेश्वरी व इतर अधिकारी, तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीष दादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री मिलिंदबापू शंकर वाघुळदे, चेअरमन श्री लीलाधरशेठ विश्वनाथ चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, व्हॉईस चेअरमन किशोर रामदास चौधरी, सहसचिव प्रा नंदकुमार आसाराम भंगाळे, सदस्य माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील, सदस्य श्री संजय काशिनाथ चौधरी, सर्व संचालक महोदय यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.