Header Ads

Header ADS

सावद्यात आठ तास रस्ता रोको; प्रत्यक्ष कामास सुरुवात, ठेकेदाराच्या व प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सावदा येथील पत्रकारांचा रस्ता रोको ला यश



 सावद्यात आठ तास रस्ता रोको; प्रत्यक्ष कामास सुरुवात,

 ठेकेदाराच्या व प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सावदा येथील पत्रकारांचा रस्ता रोको ला यश

लेवा जगत न्यूज सावदा -येथे ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून प्रकल्प अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून इंजिनीयर चंदन गायकवाड यांनी मागील वेळी झालेल्या उपोषणावेळी लेखी दिल्यानंतरही नऊ महिन्यानंतर काम पूर्ववत सुरू झाले नसल्याने मंगळवार रोजी शहरातील  पुन्हा शहरातील जाफर लोन समोर रस्ता रोको आंदोलन सकाळी सात वाजता करण्यात आले यावेळी रस्ता रोको तब्बल आठ तास चालले प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार व तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासमोर ठेकेदार यांनी आज प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर व हे काम पूर्ण दीड महिन्यात करू असे सांगितल्यानंतर रस्ता रोको दुपारी तीन वाजता सुरळीत वाहतुकीस खुला करण्यात आला.

     तळोदा,शहादा,शिरपूर, चोपडा,यावल, रावेर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेपर्यंत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३बी इ यावर २३२ किलोमीटर वरती खराब झालेल्या भागाची दुरुस्तीत तसेच रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यासाठी ८२ कोटी रुपये मंजूर झाले असून या कामासाठी त्यांना एक वर्षाची मुदत दिलेली होती. त्या मुदतीत ठेकेदाराने काम केले नसल्याने व ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनला ऑक्टोबर २०२३ मध्ये लेखी आश्वासन दिले असूनही काम न केल्याने आज पुन्हा  चोपड्या पासून या रस्त्यावर रावेर पर्यंत मोठमोठे खड्डे व या रस्त्याची पूर्ण साळण झाली असून त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी दिनांक आठ रोज मंगळवार सकाळी सात वाजेपासून ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन या पत्रकार संघटनेमार्फत सुरू झालेल्या या रस्ता रोको आंदोलनात परिसरातील सर्व पत्रकार संघटना रावेर यावल तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने सामील झाले होते. सकाळी नऊ वाजेपासून स्वतः उपस्थित राहून रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष दादा चौधरी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला ,युवा नेते धनंजय चौधरी ,वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाप्रमुख शमीभा पाटील, सावदा येथील  माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,यांनी हे रस्ता रोको स्वतः सहभागी होऊन पाठिंबा दिला.  इतर राजकीय पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिल्यामुळे आंदोलस  भर पडली .यामुळे आंदोलनात रस्ता बंद असल्याने काही रावेर कडे जाणारी वाहने पोलिसांनी मस्कावद मार्गे तर जळगाव भुसावल कडे जाणारी वाहने चिनावल मार्गे वळवली होती. दरम्यान प्रकल्प अधिकारी रस्ता रोको या ठिकाणी आल्याशिवाय व काम पूर्ववत सुरू झाल्याशिवाय रस्ता रोको आम्ही सुरळीत करणार नाही असे सांगितल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्याला धुळे येथून येथे यावे लागले व ते स्वतः आल्यावर ती ठेकेदार,प्रकल्प अधिकारी व इंजिनिअर यांच्या लेखी आश्वासनानंतर काम लगेच सुरू झाल्याच्या नंतर दीड महिन्यात हे काम पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटी,पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप,  यांच्यासह स्थानिक पोलीस प्रशासन ,गृहरक्षक दल यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

    दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर व दीड महिन्यात संपूर्ण पैजपूर ते चोरवड पर्यंत ४० किलोमीटर रस्ताचे काम डांबरीकरण सह पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.