Header Ads

Header ADS

भूकंपाने हादरले अमरावती व अकोला,काही गावांत घरात भांडी पडली, काही ठिकाणी घरांना हादरे मेळघाटातील आमझरी ते टेटू दरम्यान केंद्रस्थान, १३ कि.मी. खोल तीव्रता

Earthquake-shakes-Amravati-and-Akola-in-some-villages-pots-in-houses-in-some-places-houses-shaken-between-Amzari-to-Tetu-in-Melghat-epicenter-13-km-deep-intensity


भूकंपाने हादरले अमरावती व अकोला,काही गावांत घरात भांडी पडली, काही ठिकाणी घरांना हादरे

मेळघाटातील आमझरी ते टेटू दरम्यान केंद्रस्थान, १३ कि.मी. खोल तीव्रता

वृत्तसंस्था अमरावती-अमरावती व अकोला जिल्ह्यातील काही भागात सोमवारी ३० सप्टेंबरला दुपारी १ वाजून ३७ मिनीटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. या धक्क्यांमुळे कुठेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र ज्या भागात अचानक धक्के बसले, त्या भागातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण तयार झाले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ नोंदवली गेली असून, त्याची खोलवर तीव्रता तब्बल १३ किलोमीटर असल्याचे नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजिकल व स्थानिक भूगर्भशास्त्र तज्ज्ञांनी सांगितले आहे.    अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली आणि तिवसा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

      दरम्यान अंजनगाव, अचलपूर, धारणी, चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये काही घरातील भांडे खाली पडली तर काही ठिकाणी घर, इमारतींना काही प्रमाणात हादरे बसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या भूकंपाचे केंद्रस्थान मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आमझरी, टेटू या गावादरम्यान आहे. दरम्यान भूकंपामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

       भूकंपामुळे दरड        

    मेळघाटात दरडीने बसचे नुकसान, प्रवासी बचावले भूकंपामुळे खटकाली (केंद्रबिंदू परिसर) जवळ परतवाडा आगाराची बस क्र. एमएच ०७ सी/९४८२ वर जात होती. त्याचवेळी दरड पडली. त्यामुळे एसटीचा बाहेरील पत्रा फाटला. ही बस परसापूर, खोगडा मार्गे धारणीकडे जात होती. चालक संदीप धुमाळे यांना बसवर दरड पडण्याचा अंदाज येताच त्यांनी बस पुढे नेत प्रवाशांचा जीव वाचवला. एसटीतून प्रवाशांना धारणी येथे नेले, अशी माहिती एसटीचे विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

     फर्स्ट पर्सन एसटी बसचालक संदीप धुमाळे (भूकंपामुळे दरड पडून धावत्या बसवर दगड पडला, त्याचे चालक) मागून धाडकन् आवाज येताच बसमधील प्रवासी गोंधळून उभे झाले मी परतवाड्यावरुन सकाळी १० वाजता धारणी जाण्यासाठी बस घेऊन निघालो. धारणीसाठी ही फेरी परतवाड्यावरुन बेलकुंड, कुवा या अंतर्गत मार्गाने धारणी गाठते. या मार्गाने ही एकच बस असल्यामुळे प्रवाशांची गर्दी राहते, आजही बसमध्ये ४० पेक्षा जास्त प्रवासी होते. दरम्यान परतवड्यापासून सुमारे ७० ते ७२ कि.मी. वरील बेलकुंड सोडले व काही अंतर बस घेऊन समोर आलो. त्यावेळी अंदाजे दुपारचा सव्वा वाजला असेल बसच्या मागील बाजूने एकदम धाडकन् असा आवाज झाला. बसमधील प्रवासी घाबरले, गोंधळले व प्रवासी बसमध्येच उभे झाले. आवाज झाल्यामुळे मला वाटले मागून कोणते तरी वाहन बसला धडकले म्हणून मी बस उभी केली. खाली उतरुन पाहतो तर भला मोठा दगड बसच्या मागील बाजूवर येऊन पडला होता. नंतर लक्षात आले की, दरड कोसळून हा दगड खाली आला व बसवर धडकला. त्यामुळे बसचा पत्रा फाटला गेला. मात्र बस सुरू होती. यावेळी प्रवाशांना किंवा मला, वाहकाला दुखापत झाली नाही. दरम्यान काही अंतरावर पुढे गेलो तर कळले कि, भूकंपाचे धक्के या भागात जाणवले. व त्या धक्क्यांमुळे बसवर दगड कोसळला. दरम्यान आता (रात्री ८ वाजता) धारणी जाऊन गोलाई गावात सुखरूप पोहोचलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.