Header Ads

Header ADS

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूलचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका

 

Dr-Ulhas-Patil-English-Medium-School-National-Competition-Danka

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूलचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका 

लेवाजगत न्यूज सावदा-सिबीएससी नॅशनल आर्चरी चॅम्पिअनशिप २०२४-२५ राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच दिनांक २२ ते २६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान दिल्ली येथिल अग्रसेन मॉडर्न स्कूल  येथे संपन्न झाल्या. सावदा येथिल सदर स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल  व एकलव्य धनुर्विद्या अकॅडेमी नांदगाव खंडेश्वरची  विद्यार्थिनी जिज्ञासा प्रशांत भारंबे हिने १७ वर्षे वयोगटात रिकर्व्ह प्रकारात ६० मिटर १st डिस्टन्स ब्रॉंझ मेडल, २nd  डिस्टन्स गोल्ड मेडल व ओव्हरऑल प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. तिने २ गोल्ड व १ ब्रॉंझ असे एकूण तीन पदक प्राप्त केले आहे. 

Jafar lown


    याआधी सुद्धा जिज्ञासा हिने राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त केले आहे. गुजरात येथे १० ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी  तिची निवड झाली आहे.  तिला भारतीय संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. अमर जाधव  तसेच सिनियर खेळाडू निशांत राठोड व ओम कोळी यांचे मागर्दशन मिळाले. तसेच डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूलचे संचालिका  केतकी ताई पाटील यांचे अनमोल सहकार्य मिळत असते. तिच्या या यशासाठी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,  डॉ. केतकी ताई पाटील, मुख्याध्यपिका भारती महाजन, एकलव्य धनुर्विद्या अकॅडमीचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव  यांनी तिचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.