Header Ads

Header ADS

डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्काः दीपेश म्हात्रेसह माजी नगरसेवक हाती घेणार मशाल

दीपेश म्हात्रेसह माजी नगरसेवक हाती घेणार मशाल



डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्काः दीपेश म्हात्रेसह माजी नगरसेवक हाती घेणार मशाल

वृत्तसंस्था डोंबिवली- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मतदारसंघात भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत. शिंदे गटाचे गटाकडून दीपेश म्हात्रे इच्छुक आपल्याला संधी मिळणार नाही हे लक्षात घेत ते ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. 

     दरम्यान दीपेश म्हात्रे यांच्यासह डोंबिवलीमधील ४ माजी नगरसेवक हे सुद्धा शिंदे गटाला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. डोंबिवली बॅनर प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गट भाजप पदाधिकार्यांमध्ये कुरघोड्या सुरू होत्या यानंतर शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी शिंदेंना रामराम ठोकणार असल्याचे संकते दिले आहेत. 

  मी, डोंबिवली विधानसभेतील एका जबाबदार नागरिकाच्या नात्याने आपणास निवेदन करीत आहे की, गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली विधानसभेतील वातावरण गढूळ करण्याचे कार्य काही लोकांकडून करण्यात येत आहे. हे लोक पक्षाच्या नावाखाली दहशत पसरवून, समाजात दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप दीपेश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तर काही दिवसांपूर्वीच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक स्टेटसवर आम्हाला गणपत गायकवाड व्हायचे नाही अशा प्रकारच्या धमकीवजा पोस्ट्स ठेवल्या होत्या. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या स्टेटसमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, तुमची अवस्था महेश गायकवाड यांची केली तशी करू असे म्हणत, त्यांनी मला ठार मारण्याचा इशारा दिला आहे, असा गंभीर आरोप दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

   डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे हजारो कार्यकर्त्यांसह काही वेळात मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे यांचा प्रवेश होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.