Header Ads

Header ADS

कोरोनानंतर आता वटवाघूळ पसरवतायत 'हा' विषाणू? WHO कडून अलर्ट, नवीन विषाणूची लक्षणं जाणून घ्या

 

कोरोनानंतर आता वटवाघूळ पसरवतायत 'हा' विषाणू? WHO कडून अलर्ट, नवीन विषाणूची लक्षणं जाणून घ्या


लेवाजगत न्युज मुंबई:- गेल्या काही वर्षात कोरोनाने अवघ्या जगभरात धूमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळे अवघ्या जगात भीतीचं वातावरण निर्माण झालं. कोरोना संपतो तोच आता आणखी एक नवी समस्या दार ठोठावत आहे. कोविड 19 नंतर आता देशात नवीन विषाणू पसरण्याचा धोका आहे. भीतीदायक बाब म्हणजे कोरोनाप्रमाणेच हा देखील वटवाघळांमुळे झाल्याचा संशय आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 90% रुग्णांसाठी ते घातक आहे. जगात आतापर्यंत 8 रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनानंतर आता वटवाघळांनी पसरला हा विषाणू? मारबर्ग या नवीन विषाणूची लक्षणे

या नवीन विषाणूचे नाव मारबर्ग आहे. यानंतर रुग्णांना ताप, तोंडाची चव कमी होणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी अशा समस्यांचा सामना करावा लागतो. मारबर्ग विषाणू असलेल्या रुग्णांमध्ये जुलाब, पोटात ढेकूळ जाणवणे, उलट्या होणे आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. आफ्रिकन देशातून भारतात येणाऱ्या लोकांमुळे येथे हा विषाणू पसरण्याचा धोका आहे. याशिवाय संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 160 लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे.

मारबर्गची वाढती रुग्णसंख्या, चिंतेचा विषय 

सध्या, मारबर्ग विषाणू रवांडा, पूर्व आफ्रिकेत पसरला आहे. येथील परिस्थिती पाहून WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ने आफ्रिकन देशांमध्ये त्याच्या धोक्याबाबत अलर्ट जारी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मास्क घालण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवांडामध्ये आतापर्यंत 26 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 160 लोकांवर देखरेख

WHO च्या अहवालानुसार, हा संसर्ग रवांडाच्या 30 जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. 26 पैकी 20 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आफ्रिकन देशांतून भारतात येणा-या लोकांपासून येथे हा विषाणू पसरण्याचा धोका आहे. सध्या रवांडामधील रूग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 160 लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.