Header Ads

Header ADS

चिनावलच्या गौरव नेमाडेची भारत सरकारच्या निती आयोगात निवड

 

Chinawal's-honor-name-election-in-the-Policy-Commission-of-the-Government-of-India

चिनावलच्या गौरव नेमाडेची भारत सरकारच्या निती आयोगात निवड 

लेवाजगत न्यूज चिनावल ता रावेर - चिनावल येथील गौरव रामदास नेमाडे यांची नुकतीच भारत सरकारच्या निती आयोगात दिल्ली येथे निवड झाली आहे.

Babseth


     भारत सरकारच्या निती आयोगात १ आक्टोबर पासून गौरवची  नियुक्ती झाली आहे. निती आयोगाच्या सिटी अर्बन प्लॅनिंग डेव्हलपमेंट या विभागात प्रामुख्याने त्याला  जबाबदारी देण्यात आली आहे. 

    गौरव चिनावल येथील रहिवासी असून त्याने चिनावल येथील नूतन माध्यमिक विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याने सी ओ पी गव्हरमेन्ट इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे बी टेक प्लॅनिंग पदवी संपादन केली. पुढील उच्च शिक्षणासाठी गेटची परीक्षा देऊन चांगले रँक मिळवत तो खरगपूर पश्चिम बंगाल येथे आयआयटी मस्टर ऑफ सिटी टाऊन प्लॅनिंगचे शिक्षण घेतले. गौरवने विविध शासकीय निमशासकीय अशासकीय संस्थांमध्ये नोकरी केली.अकोला महानगरपालिकेचा पंचवीस वर्षाचा विकास आराखडा तयार केला. यानंतर गौरव नेमाडे महाराष्ट्र शासन नीती आयोगात निवड झाली. तेथे नोकरी करून आता एक आक्टोबर पासून त्याला भारत सरकारच्या नीती आयोगात नियुक्ती करण्यात आली आहे. 

     गौरव नेमाडे हुशार गरीब होतकरू विद्यार्थी असल्याने त्याने मोठे यश स्वकर्तुत्वाने मिळवले त्यामुळे त्याचा सत्कार येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन माध्यमिक विद्यालयात करण्यात आला याबाबत गौरव चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे गौरव नेमाडे हा चिनावल येथील श्रीराम इस्टेट ब्रोकर चे संचालक रामदास तुकाराम नेमाडे व येथील बाल संस्कार केंद्राच्या शिक्षिका सरोज रामदास नेमाडे यांचा मुलगा आहे चिनावल येथील एक होतकरू विद्यार्थी भारत सरकारच्या उच्च कम आयोगात कामासाठी निवड झाल्याने चिनावलपरिसरातील ग्रामस्थ शालेय परिसरातून त्याच्या अभिनंदन होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.