Header Ads

Header ADS

चाळीसगाव विधानसभेसाठी उबाठा गटाकडून उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहीर


 चाळीसगाव विधानसभेसाठी उबाठा गटाकडून उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहीर


लेवाजगत न्युज चाळीसगाव:- चाळीसगाव विधानसभेसाठी उबाठा गटाकडून उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहीर


शिवसेना-उबाठा पक्षाने या आधीच पाचोरा मतदारसंघातून वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी जाहीर केली तर चाळीसगावात महाविकास आघाडीतून ही जागा नेमकी कुणाला सुटणार? 

यावरून खल सुरू असताना उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. टीव्ही नाईनने या संदर्भात वृत्त दिले आहे. उन्मेश पाटील यांना मातोश्रीवरून एबी फॉर्म देण्यात आला असून त्यांच्या उमेदवारीबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. 

या मतदारसंघातून आधीच मंगेश चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. परिणामी आता येथून मंगेश चव्हाण विरूध्द उन्मेष पाटील अशी सरळ लढत पहायला मिळणार आहे.chalisgaon_vidhansabha_2024


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.