रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट ८ नोव्हेंबरपर्यंत बंद
रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट ८ नोव्हेंबरपर्यंत बंद
लेवाजगत न्यूज सावदा-दिवाळी, छठपूजेच्या निमित्ताने प्रवाशांची जागोजागच्या रेल्वेस्थानकांवर प्रचंड गर्दी होणार आहे. त्यात प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची आणखी भर पडू नये म्हणून रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ८ नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाणार नाही.
दिवाळी व छठपूजेनिमित्तानेमोठ्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या गर्दीची संधी साधून समाजकंटक, चोर-भामटे सक्रिय होतात. त्यामुळे प्रवाशांना मोठे नुकसान होते. एकीकडे प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वेस्थानक परिसरात पाय ठेवायला जागा नसताना आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी किंवा त्यांना रेल्वेस्थानकावर घ्यायला येण्यासाठी अनेकजण येतात. परिणामी गर्दीत आणखीच भर पडते. तसे होऊ नये म्हणून गर्दी नियंत्रणासाठी हा निर्णय घेतला.
रेल्वे प्रशासनाकडून वृद्ध व रुग्णांना मिळाली सूट
गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे; मात्र त्यातून ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना सूट देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी येणाऱ्यांना हे निर्बंध लागू होणार नसल्याचे रेल्वेने कळवले आहे. दरम्यान, काही कारण नसताना रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांवर रेल्वेची नजर असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत