Header Ads

Header ADS

सावदा येथिल वृद्धांचे महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी रस्त्यात सापडली तरुणाने घडवले प्रामाणिकतेचे दर्शन, वृद्धाच्या मोबाईलसह रोकड असलेली पिशवी केली परत

 

Bag containing important-documents-of-savada-yethil-elderly-was-found-on-the-road-youth-made-a-view-of-authenticity-bag-with-cash-was-returned-with-elderly-mobile-


सावदा येथिल वृद्धांचे महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी रस्त्यात सापडली तरुणाने घडवले प्रामाणिकतेचे दर्शन, वृद्धाच्या मोबाईलसह रोकड असलेली पिशवी केली परत

लेवाजगत न्यूज सावदा- यावल येथील एका तरुणास फैजपूरहून यावलकडे येताना रस्त्यात पिशवी सापडली. यात मोबाईल, १० हजाराची रोकड, यासह महत्वाची कागदपत्रे होती. पिशवी घेत घरी आल्यांनतर पिशवीतील मोबाईलवर फोन आला, त्यांनी आपली पिशवी असल्याचे सांगितले. तरुणाने प्रामाणिकपणे वृद्धाची रोख रक्कम, मोबाईलसह साहित्य परत केले. पंडीत चिमण नेमाडे (वय ७४) हल्ली मुक्काम  सावदा ता. रावेर हे यावल तालुक्यातील दहीगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक शनिवारी सायंकाळी दुचाकीने फैजपुरहून यावलकडे काही कामानिमित्त येत होते. दरम्यान रस्त्यात त्यांच्या मोटरसायकलला टांगलेली रोकड, मोबाईल व महत्वाची कागदपत्र असलेली पिशवी पडून गेली होती. ही पिशवी खाली यावल येथील मतीन सिकंदर पटेल या तरुणास सापडली. दरम्यान मतीन पटेल या तरूणाने त्या कापडी पिशवी उघडून पाहिली असता त्यात मोबाईल, रोख रक्कमेसह कागदपत्रे दिसले ती पिशवी घेत तरूण घरी आला व नंतर सायंकाळी पिशवीतील मोबाईल वाजला व हा मोबाईल आणि पिशवी आपले आहे ते हरवले आहे असे पंडीत नेमाडे यांनी सांगितले.

     प्रामाणिकपणाचे कौतुक

तरूणाने यावल बसस्थानकावर बोलावून घेतले आणि पिशवी परत केली. साधा मोबाईल जरी सापडला तर तो कोणी परत करत नाही. मात्र, मोबाईल, रोख रक्कम असतांना या तरूणाने प्रामाणिकपणे परत केले. अशी माणूसकी ऐरवी दिसुन येत नाही, अशा शब्दात नेमाडे यांनी या तरूणाचे कौतुक केले. नेमाडे यांनी तरूणास १ हजार रूपये बक्षीस दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.