Header Ads

Header ADS

सावदा येथे महामार्गाच्या डांबरीकरणास सुरुवात ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनच्या आंदोलनाचे फलीत



 सावदा येथे महामार्गाच्या डांबरीकरणास सुरुवात ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनच्या आंदोलनाचे फलीत

लेवाजगत न्यूज सावदा -बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची पूर्ण चाळण झाली असून फैजपूर पासून चोरवड पर्यंत हा रस्ता खड्डेमय झाला आहे. गेल्या नऊ महिन्यापूर्वीही सावदा शहरात ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी महामार्गावरील साईड इंजिनिअर यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतरही कामात सुरुवात न झाल्याने दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ मंगळवार रोजी शहरात रावेर रोड वरील जाफर लॉन्स समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते .या रस्ता रोको आंदोलनात प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार ,साईड इंजिनियर चंदन गायकवाड, ठेकेदार भामरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनचे आंदोलन करते पदाधिकारी इतर पत्रकार यांच्या समवेत झालेल्या चर्चेनुसार डांबरीकरणास व गड्डे बुजण्याचे लेखी आश्वासन दिले होते त्या चर्चेनुसार फैजपूर ते चोरवड पर्यंतच्या रस्त्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालीआहे. हे या आंदोलनाचे फलित असून दीड महिन्यात हा४० किलोमीटरचा रस्ता पूर्ण डांबरे प्लास्टर करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

      हा रस्ता कामात सुरुवात झाली असून नागरिकांनी ठेकेदारास व इंजिनियर यांना व कामगारांना सहकार्य करावे असे आवाहन ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. डांबरी रस्ता झाल्यानंतर त्यावर पाणी साचणार नाही याची खबरदारी ही आजूबाजूला असलेल्या दुकान मालक व व्यावसायिकांनी घ्यावी जेणेकरून पुन्हा हा रस्ता त्या त्या ठिकाणी नादुरुस्त होणार नाही.सुरळीत वाहने व आपणासही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. वाटल्यास त्या मार्गावर असलेल्या पेट्रोल पंप व काही व्यावसायिकांनी जसे धाबे करून घेतले आहे त्याप्रमाणे या महामार्गावर असलेल्या व्यावसायिकांनीही आपण स्वखर्चाने निचरा होण्याच्या पाण्याचा प्रवाह करून घ्यावा. व प्रशासनात सहकार्य करावे असे केल्याने नागरिकांनाही याचे समाधान लाभेल असे त्या मार्गावरील व्यावसायिकांनी वागणूक करावी असे आवाहन पत्रकारांतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.