त्या महिलेचा अखेर मृत्यू दुचाकीचे टायर फुटून झाला होता अपघात
त्या महिलेचा अखेर मृत्यू
दुचाकीचे टायर फुटून झाला होता अपघात
लेवाजगत न्युज यावल:- यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेरील पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार, 18 ऑक्टोंबर रोजी एका दाम्पत्याच्या दुचाकीचे टायर फुटून अपघात घडला झाला होता. अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली मात्र जखमी महिलेचादेखील सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी शिरसाड गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार
यावल-भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाच्या समोर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भुसावळकडून यावलकडे दुचाकी (क्रमांक एम. एच.19 एन. 2433) द्वारे जगदीश वासुदेव अत्तरदे (53) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (45) हे पती-पत्नी येत होते.
दरम्यान पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर फुटले आणि भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात जगदीश अत्तरदे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी हेमलता ही गंभीर जखमी झाली.
गंभीर जखमी महिलेवर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री महिलेचा मृत्यू झाला व मंगळवारी शिरसाड गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात या दाम्पत्यास जीव गमावण्याची वेळ आल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत