हतनुर धरणाच्या बांधकामासाठी १८७ झाडांवर कुऱ्हाड; पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी
हतनुर धरणाच्या बांधकामासाठी १८७ झाडांवर कुऱ्हाड; पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी
लेवाजगत न्यूज सावदा- हातनुर धरणावरील नवीन आठ वक्र दरवाजे बांधकामासाठी तब्बल १८७ वेगवेगळ्या जातीच्या झाडांवर जलसंपदा विभागामार्फत कुऱ्हाड चालवली गेली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
धरणामध्ये प्रचंड गाळ साठला असून हा काळ काढण्यासाठी नव्याने आठ वक्र दरवाजाचे बांधकाम हतनुर धरणाजवळ सुरू आहे. या बांधकामात अडचण ठरणाऱ्या तब्बल १८७ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वृक्ष तोडून परवाना न घेता या लाकडांची ट्रक द्वारे वाहतूक विनापरवाना झाला असल्याचा आरोप परिसरातील पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
हतनुर धरणा शेजारीलच जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयाच्या आवारातील ही वृक्षतोड झाली आहे.यात वेगवेगळ्या जातीची मोठ मोठी झाडे (वृक्ष)तोडण्यात आली आहे. जलसंपदा विभाग यांच्याशी संपर्क साधला असता वृक्षतोड हे नियमानुसारच झाली आहे. प्रत्येक झाडाचे वन विभाग मुक्ताईनगर यांचे कडून मूल्यांकन काढण्यात आले आहे. रीतसर लिलाव करण्यात आला असल्याची माहिती धरण क्षेत्राचे उप अभियंता हेमंत सोनवणे यांनी दिली आहे.
लिलाव सहा लाखात खुल्या बाजारात मात्र किंमत लाखोच्या घरात
या १८७ वृक्षांचा लिलाव सहा लाख ३८ हजार रुपयांना झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिले आहे. मात्र खुल्या बाजारात या वृक्षांची किंमत २५ लाखापेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या वृक्षतोडी मागे काही आर्थिक देवाण-घेवांची ची किनार तर नाही ना असा देखील प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.
विनापरवाना वाहतूक
वृक्षतोड केल्यानंतर मक्तेदाराने जवळपास चार ते पाच ट्रक लाकडे भरून वाहतूक केल्याची माहिती परिसरातील रहवाशांनी दिली. परंतु वाहतुकीसाठी कोणताही परवाना मुक्ताईनगर वन विभागाकडून घेण्यात आला नसल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.
वृक्षांचे मूल्यांकन करून दिले
हतनुर धरणाचा भाग हा मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र भागात येतो.त्यांच्याकडून वृक्षतोडी संदर्भात पत्र प्राप्त झाले होते. बांधकामात अडचण ठरणाऱ्या वृक्षांचे मूल्यांकन करून जनसंपदा विभागाला पाठवण्यात आले होते. बिना परवाना वाहतूक परिशिष्टात समावेश नसलेली लाकडांची केली असल्याची माहिती आहे. परंतु इतर लाकडांची वाहतूक केली असल्यास मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल.
कृपाली शिंदे,वनपरिक्षेत्र अधिकारी मुक्ताईनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत