Header Ads

Header ADS

"गाते ग्रामस्थांचे आरोग्यधोक्यात " " ग्रामस्थांनी ग्रामसभेत वाचला समस्यांचा पाढा

 

sing-of-villagers-in-health-threat-by-villagers-in-gram-sabha- read-read-of-problems

"गाते  ग्रामस्थांचे आरोग्यधोक्यात " " ग्रामस्थांनी ग्रामसभेत वाचला समस्यांचा पाढा 

तासखेडा ता .रावेर वार्ताहर -येथुन जवळच असलेल्या गाते येथे दिनांक ५ रोजी ग्रामपंचायत मार्फत सभा सकाळी १० वाजता आयोजीत करण्यात आला होती . या ग्राम सभेत ग्रामस्थांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला तरी सुद्धा ग्रा पं पदाधीकारी ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ ठरली . 

या बाबत सविस्तर असेकी संपूर्ण गावातील गटारी तुटूंब भरल्या असुन घाणीचे साम्राज्य निर्मान झाले असून डासांचा मोठा प्रादूर्भाव झाल्याने ग्रामस्थांना अनेक साथीच्य आजाराला तोंड दयावे लागत आहे गावातील रस्त्याने चालता येत नसून गावात बऱ्याच ठिकाणी चिखल झालेले आहे . पिण्याचे पाणी ग्रामस्थांना दुषीत मिळत असुन पाण्यात टि.सी. एल. चा वापर गेल्या बऱ्याच दिवसा पासुन केला नसून ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना दुषीत पाणी मिळत आहे पाण्याची टाकी गेल्या ५ /६ महिन्या पासून स्वच्छ केली नसून पावसाळ्याचे पाणी मिश्रीत दुषीत पाणी पुरवठा ग्रामस्थांना केला जात आहे . अशा अनेक समस्यांनी ग्रामस्य त्रस्त झालेले आहे .

     १५ व्या वित्त आयोगाचा निधी या ग्रामपंचायत कडे शिल्लक असुन गावाच्या सुधारणा केल्या जात नसल्याची खंत माजी उपसरपंच मनोज वाघ यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केली . धार्मिकस्थळां वर सी सी टीव्ही कॅमेरे बसवणे, रेल्वे बोगदया पासून रस्ता क्राँकीटीकरण करणे , गावातील पाणी पुरवठा शुद्ध करून मिळावा, गावातील रस्त्यांचे काँकीटीकरण करावे ' काही ग्रामस्थ लेखी स्वरूपात अर्ज दाखल करतात त्यांच्याचा विचार आठ ते दहा दिवसात करून त्यांना होणारा त्रास कमी करावा अशा अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या . ग्रामसभेच्या वेळेस ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व पदाधीकारी यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.