Header Ads

Header ADS

ऐतिहासिक शरीआ पतपेढीचे जतन करा -आमदार शिरीष दादा चौधरी यांचे गौरव उद्गार शरीआ पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

save-the-historical-shariah-credit-bank--Amdar-Shirish-Dada-Choudhary's-glory- exclaims-the-annual-meeting-of-the-Shariah-credit-bank-concluded


ऐतिहासिक शरीआ पतपेढीचे जतन करा -आमदार  शिरीष दादा चौधरी यांचे गौरव उद्गार

शरीआ पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

लेवाजगत न्यूज फैजपूर -रविवार रोजी फैजपूर येथिल डी एन कॉलेज येथे शरीआ मुस्लिम गव्हर्मेंट सर्वट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष गौस खान हबीबउल्ला खान यांच्या अध्यक्षतेत उत्साहात पार पडली.  सभेत जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सभासद उपस्थित होते . यामध्ये विशेष करून जामनेर, जळगाव, एरंडोल , भुसावळ , धरणगाव यावल , भालोद , मारुळ , फैजपूर , सावदा , रावेर , मुक्ताईनगर , चोपडा , न्हावी,  अमळनेर येथील  सभासदांचा समावेश होता. सभेची सुरुवात कुराणपठणाने शाकीर सर व त्यानंतर  राष्ट्रीय पातळीचे कवी बासीत उमर  यांनी  नात पठण केली. संस्थेचे अध्यक्ष गौस खान यांनी सभेत वार्षिक अहवाल वाचून दाखवला व सर्व विषय  सभासदांनी एकमताने मंजूर केला.

     विशेष करून रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले . राज्यात इतक्या कमी सर्व्हीस चार्जेस वर कर्ज देणारी उर्दू  सरकारी कर्मचाऱ्यांची एकमेव पतपेढी आहे. सदरील पतपेढी ची यशस्वी  वाटचाल कौतुकास्पद आहे. पतपेढीस सांभाळणे जिल्ह्यातील उर्दू कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. 

गौसखान, असलम खान,  नफीस अहमद यांनी आमदार शिरीष चौधरी यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत सत्कार केले.

संस्थेचे सर्व संचालक रईस  खान सुभान खान , कुरेशी इलियास अहमद , जावेद अख्तर हबीब , आसिफ हाफिज खान , मुजीबुर रहमान शे मुसा , तडवी मेहेरबान खा, सै. गजाला तबससुम ,  खान अफशां तरननुम , सय्यद अफझाल अहमद , शेख कमालुद्दीन हुस्नुद्दीन , शेख रईस न्याजमोहम्मद,  शे  इफ्ताखार अहमद , ऐनोददिन सर, मजहरुददीन सर , केंद्र प्रमुख मुख्तार सर व सभासद उपस्थित होते.

सभासदांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. पतपेढीस उपयुक्त असे सल्ले ही घेण्यात आले व त्यावर उपाययोजना करण्याचे संस्थेचे उपाध्यक्ष नफीस अहमद ,  असलम खान, मुजीब अहमद , जावेद अख्तर,  रईस खान, कुरेशी इलियास अहमद , कमाल सर , आसिफ खान व सर्व संचालक मंडळाने आश्वासित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाकीर सर रावेर यांनी केले. आभार कमाल सर यांनी मानले.

राष्ट्रगीत पठनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. सभे नंतर सर्व उपस्थितांना जेवण देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.