Header Ads

Header ADS

दुःखद बातमी -जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला मिक्सर ट्रकची धडक तरुण ठार ; एक जखमी

sad-news-in-jalgaon-cyclist-hit-by-mixer-truck-on-national-highway-young-one-killed-one-injured


 दुःखद बातमी -जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला मिक्सर ट्रकची धडक तरुण ठार ; एक जखमी

लेवाजगत न्यूज जळगाव-जळगाव शहरातील जकात नाका जवळ महामार्ग वर भरधाव वेगाने जाणाऱ्या काँक्रीट मिक्सर वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर दुसरा तरूण जखमी झाला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी करत एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कुणाल राजेंद्र महाले वय-२५, रा. नाहाटा नगर, भुसावळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

   या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील न नाहाटा नगरात कुणाल महाले हा तरुण आई वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. कुणाल हा नुकताच तीन महिन्यापूर्वीच भुसावळ शहरातील के.नारखेडे महाविद्यालयात क्लर्क म्हणून नोकरीला लागला होता. दरम्यान महाविद्यालयाच्या  कामकाजानिमित्त कुणाल महाले आणि त्याचा सहकारी निखिल शरद बर्‍हाटे हे  दोघेजण भुसावळवरून विद्यापीठात जाण्यासाठी जळगाव शहरातून जात होते. त्यावेळी जळगाव शहराच्या पुढे असलेल्या जकात नाका जवळून जात असताना मागून भरधाव वेगाने येणारे काँक्रीट मिक्सरने ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट मारला या अपघातात कुणाल महाले हा रोडवर पडल्याने मागून येणाऱ्या काँक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आले. त्यात कुणालाचा जागीच मृत्यू झाला तर निखिल बऱ्हाटे हा किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर नातेवाईक व महाविद्यालयातील सहकारी यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान घरातील कमवता मुलगा गेल्याने रुग्णालयात त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.