Header Ads

Header ADS

खिर्डीजवळ दीडशे फूट उंच टॉवरवर चढून गळफासाने तरुणाची आत्महत्या

खिर्डीजवळ दीडशे फूट उंच टॉवरवर चढून गळफासाने तरुणाची आत्महत्या


खिर्डीजवळ दीडशे फूट उंच टॉवरवर चढून गळफासाने तरुणाची आत्महत्या

लेवाजगत न्यूज खिर्डी- खिर्डी (ता. रावेर) येथून जवळ असलेल्या खिर्डी ते विवरा रेल्वे रस्त्यालगत पावर ग्रीड कंपनीचे अतिउच्च क्षमतेचे मोठमोठे टॉवर आहेत. त्यांची उंची सुमारे दीडशे ते दोनशे फूट आहे. यापैकी एका टॉवरवर चढून छत्तीसगड राज्यातील ब्रिजेशकुमार काटकीज बैगा (वय २६, रा. बिरोह, ता. जनकपूर) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

     दरम्यान, मंगळवारी सकाळी खिर्डी ते विवरा रस्त्यावरील संतोष तेली यांच्या शेतातील टॉवरवर चढून एका तरुणाने गळफास घेतल्याची माहिती कळताच अनेकांनी घटनास्थळ गाठले. पण, मृतदेह सुमारे सव्वाशे फूट उंचीवर एका लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या स्थितीत होता. यामुळे ओळख पटत नव्हती. ही माहिती खिर्डी येथील पोलिस पाटील रितेश चौधरी यांनी निंभोरा पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तब्बल सहा ते सात तासानंतर मेहनत घेऊन उंट टॉवरवर लटकलेला मृतदेह खाली उतरण्यासाठी यंत्रणा राबवली. त्यासाठी अकोला येथून पथक बोलावले होते. खिर्डी, विवरा परिसरातील तरुणांनी सुद्धा मदत केली. मृतदेह खाली उतरवल्यानंतर पॅन्टच्या खिशातील पॅनकार्डवरून त्याचे नाव ब्रिजेशकुमार बैगा असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी नातेवाईकांना संपर्क साधला. निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.