Header Ads

Header ADS

साकेगावात महिलेचा चाकू भोसकून खून; मारेकरीला अटक

 

Woman-Knife-Stabbing-Killer-Arrested in Sakegaon

साकेगावात महिलेचा चाकू भोसकून खून; मारेकरीला अटक

वृत्तसंस्था साकेगाव-तालुका भुसावळ भुसावळ येथे एका महिलेला चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या गुन्ह्यातील मारेकऱ्यास अटक करण्यात आली असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनाली महेंद्र कोळी रा. साकेगाव ता. भुसावळ असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

   या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे सोनाली महेंद्र कोळी ही महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास महिलेचे गावात राहणारा सागर रमेश कोळी (वय – २८) याच्यासोबत भांडण झाले या रागातून सागर कोळी याने हातात असलेला चाकूने पाठीवर पोटावर वार करून सोनाली कोळी या महिलेचा खून केला. तसेच दोघांचे भांडण सुरू असताना विनोद सुभाष कुंभार (वय -२८) हा भांडण सोडवण्यासाठी आला असता. त्याच्या हातावर देखील वार करून तो “आमच्या मधात येऊ नकोस नाहीतर तुला ठार मारून टाकेल" असा दम दिला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर साकेगाव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि पथक घटनांसाठी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून भुसावळ दवाखान्यात रवाना करण्यात आला. गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता संशयित आरोपी सागर रमेश कोळी (वय-२८) राहणार साकेगाव याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.