Header Ads

Header ADS

वीजेच्या धक्क्याने तरूणीचा दुदैवी मृत्यू; जळगावातील घटना

 

Unfortunate-death-of-a-youth-by-electricity-incident-in Jalgaon

वीजेच्या धक्क्याने तरूणीचा दुदैवी मृत्यू; जळगावातील घटना

लेवाजगत न्यूज जळगांव- विजेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रंजिता राहूल सोनार वय २४ रा. सोमानी गल्ली, पिंप्राळा, जळगाव असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, रंजिता सोनार ही तरूणी आपल्या कुटुंबासह हरिविठ्ठल नगरात सोमाणी गल्लीत वास्तव्याला होती. गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी घरी काम करत असतांना तिला इलेक्ट्रीक शॉक लागल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.