Header Ads

Header ADS

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १३ वर्षीय बालिकेचा मृतदेह शेतात आढळला; एक ताब्यात

 

The body of a 13-year-old-girl-who-was-missing-for-three-days-was-found-in-a-field-in-possession.

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १३ वर्षीय बालिकेचा मृतदेह शेतात आढळला; एक ताब्यात

लेवाजगत न्यूज तळोदा-तालुक्यातील खरवड येथील तीन दिवसांपासून बेपत्त असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी केळीच्या बागेत आढळला. दरम्यान पोलिसांनी तपास चक्रे फिरवत संशयित आरोपीस अटक केली. दरम्यान शवविच्छेदनानंतर घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 




      खरवड येथील १३ वर्षीय मुलीस पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी मंगळवारी येथील पोलिसांत केली होती. जिल्हा परिषद शाळेसमोरून सातवीच्या वर्गात शिकणारी ही विद्यार्थिनी मंगळवारी सकाळी अचानक बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी गावात व नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र ती मिळाली नव्हती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, गुरुवारी रोजी मोड शिवारातील सुभाष छगन नवले यांच्या केळीच्या शेतात मजूर निंदणी करत असताना बेपत्ता असलेल्या या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आपत्तीजनक अवस्थेत आढळला. दरम्यान अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला. मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.


पोलिस, एलसीबीच्या पथकाने केली संयुक्त कारवाई


पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनंत कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दर्शन दुगड, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सपोनि राजेंद्र लोखंडे, पोउनि महेश निकम, धर्मेंद्र पवार, मुकेश पवार आदी पोलिस अधिकारी व एलसीबी कर्मचारी यांनी संयुक्तपणे आरोपीस पकडण्याची कारवाई केली.

पोलिस ठाण्यात संतप्त जमाव; आरोपीस अज्ञात स्थळी हलवले

दरम्यान तालुक्यातील संतप्त नागरिकांनी येथील पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली. संतप्त जमावाने, आरोपीस आमच्या ताब्यात द्या, त्यास फाशी द्या, अशा घोषणा दिल्या. जमावाचा रोष पाहता पोलिस विभागाने आरोपीस अज्ञात स्थळी रवाना केल्याने जमाव पांगला. आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बिरसा आर्मी, जय आदिवासी युवा सेना या संघटनांनी निवेदनाद्वारे केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.