Header Ads

Header ADS

वडताल धाम द्विशताब्दी महोत्सवाच्या आमंत्रण निमित्त निघालेल्या रथाचे सोमवारी संध्याकाळी होणार सावद्यात आगमन

 

The arrival of the chariot which left for the invitation of the Vadtal-Dham-bicentenary-festival-will be-on-Monday-evening.

वडताल धाम द्विशताब्दी महोत्सवाच्या आमंत्रण निमित्त निघालेल्या रथाचे सोमवारी संध्याकाळी होणार सावद्यात आगमन

लेवा जगत न्यूज सावदा- गुजरात वडताल धाम येथील श्री लक्ष्मीनारायण देव द्विशताब्दी महोत्सवानिमित्त होणाऱ्या समाप्ती कार्यक्रमाचे आमंत्रण निमित्त निघालेला भारत भ्रमंती रथ आपल्या सावदा शहरात दिनांक ३० रोजी रोज सोमवार संध्याकाळी सहा वाजता आगमन होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी व हरिभक्त यांनी याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामीनारायण मंदिर सावदाचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी यांनी केले आहे.

   गेल्या वर्षापासून वडताडधाम श्री लक्ष्मीनारायण देव द्वि शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामीनारायण मंदिरात होत आहे .या महोत्सवानिमित्त  गुजरात येथिल वडताल धाम येथे समाप्ती सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे .त्या कार्यक्रमाच्या निमित्त आमंत्रण घेऊन रथ आपल्या सावदा शहरात,शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होणार आहे.हा आमंत्रण रथ दिनांक ३० रोज सोमवार संध्याकाळी सहा वाजता दुर्गामाता मंदिराजवळ येईल. तेथून दुर्गा माता चौक, भगवान महावीर चौक,इंदिरा गांधी चौक,छत्रपती संभाजी चौक,गांधी चौक,गवत बाजार,शारदा चौक, माळीवाडा,रविवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वंजारवाडी,दादा गल्ली,कॉर्नर रोड मार्गे सुभाष चौक,येथून मार्गस्थ होऊन सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिर येथे आरतीचा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमास शहरातील महिला,युवक,युवती,पुरुष हरिभक्त यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच ज्यांना या मिरवणुकीत सहभागी व्हायचे असेल त्या महिला व तरुणींनी स्वतः कलश व तयारी करून मिरवणुकीत जास्तीत जास्त संख्येने या रथयात्रेत सहभागी व्हावे,मार्गावर येणाऱ्या चौका चौकामध्ये रथाचे स्वागत व भगवंताचे पूजन करावे असे आवाहन श्री स्वामीनारायण मंदिर चे कोठारी स्वयंप्रकाश दासजी, मंदिर ट्रस्टी ,महिला मंडळ,युवक मंडळ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.