Header Ads

Header ADS

तारापूर पुन्हा स्फोटाने हादरले ! पाच कामगार भाजले, तीन गंभीर ... अनेक जणांना किरकोळ दु:खापत...

 

तारापूर पुन्हा स्फोटाने हादरले ! पाच कामगार भाजले, तीन गंभीर ... अनेक जणांना किरकोळ दु:खापत...



लेवाजगत न्युज तारापूर:- दि. २०, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एन झोन मधील कॅलेक्स केमिकल अँड फार्मासिटिकल या कंपनीमध्ये दुपारी १.४० वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला.

या स्फोटा मध्ये पाच कामगार भाजले असून, यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते, यांतील तीन जणांना  तारापूर एमआयडीसी मधील तुंगा हॉस्पिटल व इतर किरकोळ जखमींना बोईसर येथील डॉक्टर कुलकर्णी यांच्या पराग हॉस्पिटलमध्ये उपचारात दाखल करण्यात आले आहे. 


आज दुपारी १.३० वाजाताच्या सुमरास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एन झोन आच्यानक मोठ्या आवाजासह हादरला या स्फोटाचा आवाज जवळपास ३ किलो मीटरच्या परीसरात स्पष्टपणे एकाला केल्याचे नागरिकांनी सांगीतले, दरम्यान नेहमी प्रमाणेच कारखान्यात केमिकल उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक हा स्फोट झाला, रियक्टरचे तापमान अचानक वाढून त्याचा स्फोट होऊन त्यातून आगीचा भडका उडाला. या अपघातात रीयक्टर मधील पेटते केमिकल शरीरावर पडून १) राजमनी मौर्य, २) पवन देसले, ३) आदेश चौधरी, ४) निशिकांत चौधरी व ५) संतोष हिंडलेकर असे पाच कामगार गंभीररीत्या भाजले आहेत.

पुढील तपास तारापूर पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.