Header Ads

Header ADS

सहा ट्रेन सुरत ऐवजी उधना पर्यंतच धावणार

 

Six-trains-will-run-to-Udhna-instead of Surat

सहा गाड्या सुरत ऐवजी उधना पर्यंतच धावणार

लेवाजगत न्यूज भुसावळ- भुसावळ-सुरत स्थानकावर फलाट चारवरील ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. यामुळे सुरत रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि सुरतपर्यंत धावणाऱ्या भुसावळ विभागातील ६ गाड्या सुरतऐवजी उधना येथून सुटतील. सुरतऐवजी उधना स्थानकापासून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये १९००७ सुरत भुसावळ पॅसेंजर (८ ते ३० सप्टेबर) उधना येथून सायंकाळी५.२४ वाजता सुटेल. १९००५ सुरत-भुसावळ एक्स्प्रेस रात्री ११.३० वाजता, ०९०६५ सुरत-छपरा विशेष गाडी सकाळी ८.३५ वाजता, १९०४५ सुरत-छपरा ताप्तीगंगा एक्स्प्रेस सकाळी १०.२० वाजता, २२९४७ सूरत-भागलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस (१० ते २९ सप्टेबर) सकाळी १०.२० वाजता, २०९२५ सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस दुपारी १२.३० वाजता सुटेल.

    शॉर्ट टर्मिनेट गाड्या

१९००७ भुसावळ - सुरत एक्स्प्रेस (८ ते ३० सप्टेंबर), १९००६ भुसावळ सुरत एक्स्प्रेस, अमरावती - सुरत सुपरफास्ट, ०९०६६ छपरा- सुरत विशेष गाडी (११ ते २५ सप्टेंबर), १९०४६ छपरा- सुरत ताप्तीगंगा एक्सप्रेस (२९ सप्टेंबरपर्यंत), २२९४८ भागलपूर - सुरत सुपरफास्ट ३० सप्टेंबरपर्यंत सुरतऐवजी उधनापर्यंतच धावेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.